शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी उल्हासनगरात भाजप-सेनेमध्ये रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:39 IST

इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल; ओमी टीम समर्थक भूमिगत

- सदानंद नाईक उल्हासनगर : भाजपमधील ओमी टीम समर्थक काही नगरसेवक भूमिगत झाल्याने महापौरपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. भाजप आघाडीकडून गटनेते जमनुदास पुरस्वानी व साई पक्षप्रमुख जीवन इदनानी, तर शिवसेनेतर्फे लीलाबाई अशान यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. उपमहापौरपदासाठी भाजपकडून विजय पाटील, टोणी सिरवानी, तर शिवसेनेकडून रिपाइंचे भगवान भालेराव आणि राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री यांनी अर्ज दाखल केला असून, २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे.उल्हासनगर महानगरपालिकेत भाजप-ओमी टीम व साई पक्षाची आघाडी सत्तेत आहे. विरोधी बाकावर शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं व इतर लहान पक्ष आहेत. महापालिकेत भाजप-ओमी टीमचे-३१ व साई पक्षाचे-१२, शिवसेनेचे-२५, राष्ट्रवादी-४, रिपाइं-३, तर भारिप, काँग्रेस व पीआरपी यांचे प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजप आघाडीकडे एकूण ४३, तर शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्ष मिळून एकूण ३५ नगरसेवक आहेत. बहुमतासाठी ४० नगरसेवकांची आवश्यकता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊन महापौर पंचम कलानी यांना उमेदवारी न दिल्याने, भाजपमधील काही ओमी टीम समर्थक नगरसेवक नाराज आहेत. अशातच ओमी कलानी हे टीमच्या काही समर्थक नगरसेवकांसह भूमिगत झाल्याची चर्चाही शहरात रंगली आहे.भाजपमधील ओमी टीम समर्थक नगरसेवकांनी बंडखोरी केली तर, शिवसेनेच्या लीलाबाई अशान महापौरपदी निवडून येण्याची शक्यता आहे. यासाठी पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे.भाजपमधील नाराज ओमी टीम नगरसेवकांचा फायदा घेण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली असून शिवसेना नगरसेवक अरुण अशान हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. लीलाबाई अशान त्यांच्या आई आहेत. सलग तीनवेळा लीलाबाई अशान नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून, त्यांनी यापूर्वी महापौरपद भूषविले आहे. भाजप आघाडीचे गटनेते जमनुदास पुरस्वानी व साई पक्षप्रमुख जीवन इदनानी यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. उपमहापौरपदासाठी भाजप आघाडीकडून विजय पाटील व साई पक्षाचे टोणी सिरवानी यांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री व रिपाइंचे भगवान भालेराव यांनीही उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत.भाजप करणार व्हिप जारीभाजपाच्या एकूण ३१ नगरसेवकांना मंगळवारी पक्षादेश (व्हिप) जारी करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ता मनोज लासी यांनी दिली. यामध्ये ओमी टीम समर्थक नगरसेवकांचाही समावेश आहे. यावर ओमी टीमचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी टीमचे समर्थक नगरसेवक शहरहिताचा निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली. एकूणच भाजपमधील ओमी टीम समर्थक नगरसेवकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाulhasnagarउल्हासनगर