शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगली द्वीपात्रीची जुगलबंदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:03 IST

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर द्वीपात्रीची जुगलबंदी रंगली होती. 

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर रंगली द्वीपात्रीची जुगलबंदी लवकरच ४००व्या कट्ट्याचा इतिहास अनुभवायला मिळेल : किरण नाकतीनवरा म्हणू नये आपला हि एकपात्री सादर

ठाणे : ठाण्याची सांस्कृतिक ओळख म्हणजेच अभिनय कट्टा. ३९६ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांना द्विपात्री अभिनयाची जुगलबंदी अनुभवयाला मिळाली. प्रेक्षक प्रतिनिधी मनीषा मूळे यांच्या हस्ते दिप्रज्वलन करून कट्ट्याची सुरुवात करण्यात आली.आशा राजदेरकर यांनी नवरा म्हणू नये आपला हि एकपात्री सादर केली.

कोणत्याही धंद्यात मार्केटिंग असेल तर आपण पुढे जाऊ शकतो हे नमूद करणारी द्विपात्री म्हणजे प्रोफेशनल भिकारी. एका सर्वसामान्य नोकरी करणाऱ्या तरुणापेक्षा ,एक तरुण भिकारी कशी आपली कमाई करतो हे विनोदी अंगाने मांडण्याचा प्रयत्न ओंकार मराठे व सहदेव साळकर या कट्ट्याच्या कलाकारांनी केला. राजन मयेकर व कुंदन भोसले यांनी बाप नंबरी और बेटा दस नंबरी ह्या द्विपात्रीतून पूजा सांगणाऱ्या ब्राह्मण बापाची व त्याचा धंदा वाढवावा म्हणून मुलगा एक पाऊल पुढे टाकत भिक्षुकीचा व्यवसाय कसा करतो हे हलक्याफुलक्या पद्धतीने मांडले. जंतर मंतर या हॉरर कॉमेडी द्विपात्रीच्या माध्यमातून सहदेव कोळंबकर व वैभव चव्हाण या जोडीने  लोकांना हसत हसत घाबरवले सुद्धा. तसेच नवराबायकोची कमाल ,यमाची धम्माल या लघुनाटिकेतुन एका दारुड्या इसमाला  स्वर्गात घेऊन जायला निघालेला यम त्या दारुड्या इसमाच्या व त्याच्या बायकोच्या कचाट्यात कसा सापडतो हे विनोदी अंगाने  अर्जुन नाईक, प्रतिभा घाडगे , श्रीराम विधाटे व मोहन पानसरे यांनी सादर केले.या संपूर्ण कट्ट्याचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले. आजपर्यंतचा संघर्षमय प्रवास केवळ कट्ट्याचे कलाकार, रसिक मायबाप, प्रसारमाध्यमं व अभिनय कट्ट्याच्या सर्वच हितचिंतकांमुळेच करू शकलो आणि लवकरच ४००व्या कट्ट्याचा इतिहास आपल्या सर्वांमुळेच अनुभवायला मिळेल असे आपले मत संचालक किरण नाकती यांनी व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई