शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

फोटोसाठी नदीत उडी मारली अन् जीव गमावला; नेरळनजीकच्या पेज नदीमध्ये बुडून पर्यटकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 09:32 IST

दोन दिवसांपूर्वी अंधेरी (मुंबई) परिसरातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी नेरळजवळील मिरचोली येथे पर्यटनासाठी आले होते. 

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : नेरळनजीकच्या मिरचोली गावातून वाहणाऱ्या पेज नदीमध्ये एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी नदीच्या प्रवाहात बुडालेल्या आदित्य मोरे या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नदीपात्रात सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. पेज नदीमध्ये खडकावर आणि पाण्यात उड्या मारण्याचे छायाचित्र काढण्याच्या नादात या तरुणाचा नदीत तोल जाऊन बुडाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. अधिक तपास सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी अंधेरी (मुंबई) परिसरातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी नेरळजवळील मिरचोली येथे पर्यटनासाठी आले होते. 

खडकावर बसून तो छायाचित्र काढत होता...दुपारी जेवणानंतर व्यवसायाने कला दिग्दर्शक असलेले सुकांत पाणीग्राही यांचा मुलगा सौजस याच्यासोबत पर्यटनासाठी आलेले गौतम, शुभम, यश, भूषण आणि आदित्य असे सर्व जण नेवाळी गावाच्या पेज नदीकिनारी फिरण्यासाठी गेले. आदित्य मोरे यास पोहता येत नसल्याने नदीमधील खडकावर बसून तो छायाचित्र काढत होता. नंतर त्याने लाईव्ह फोटोसाठी पाण्यात उडी मारली.

बोटी घेऊन तपासआपले विशेष छायाचित्र काढण्यासाठी त्याने नदीच्या पाण्यात उडी मारली, तो दिसेनासा झाला. बुडालेल्या आदित्यचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, शोध न लागल्याने नेरळ पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक किसवे यांच्याकडून खोपोली येथील शोध पथकाला मदतीसाठी पाचारण केले. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत या पथकातील गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, अमोल कदम, राजेश पारथे, नीलेश कुढले, अमोल ठाकेकर, विशाल चवण, सौरभ घरात, महेश भोसले, प्रेम पाटील, संतोष मोर, मोहन पवार, भक्ती साठेलकर यांनी नदीमध्ये बोटी घेऊन तपास करण्याचा प्रयत्न केला.