शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

कोरोना हॉस्पीटलवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:59 IST

कोरोना बाधीत रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी नगरसेवक निधी मागतिला जात आहे. याला भाजपने विरोध केला आहे, परंतु हा विरोध केवळ एक राजकारण असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे. 

ठाणे : कोरोना रुग्णांसाठी महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु त्यासाठी नगरसेवकांच्या खिशाला कात्री लावली जाणार असल्याने भाजपने याला विरोध केला आहे. परंतु भाजपला आता महापौर नरेश म्हस्के यांनी थेट उत्तर दिले असून महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीचे जे राजकारण केले जात आहे तसे राजकारण आपण कृपया ठाण्यात करु नये अशी विनंती केली आहे. शिवाय भाजपने ज्या बैठकीवर आक्षेप घेण्यात आला त्या बैठकीत यावर चर्चाच झाली नसल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले आहे. तसेच निधी देण्याबाबत सर्व नगरसेवकांनी अनुमती दिली आहे. त्यामुळे उगाच राजकारण करुन चांगल्या कामात खोडा न घालण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.                            कोरोना रुग्णालयासाठी नगरसेवक निधी वापरण्याऐवजी आपला दवाखानाचा निधी वापरावा असे मत भाजपच्या नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. त्या अनुषगांने आता महापौरांनी त्यांना सुनावले आहे. आयुक्तांच्या कार्यालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये निधी वर्ग करण्याचा परस्पर निर्णय घेतला असल्याचे नमूद केले आहे. परंतु या बैठकीमध्ये नगरसेवक निधीबाबत कोणत्याही प्रकारे चर्चा अथवा निर्णय झाला नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. त्यातही ही बैठक पालकमंत्र्यांनी शिष्टाचाराप्रमाणे बोलविलेली बैठक नव्हती, त्यामुळे या बैठकीस स्थानिक आमदार, कोकण पदवीधर आमदार, गटनेते यांना बोलवणे अपेक्षीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या कोरोनाची युध्दजन्य परिस्थीती असल्यामुळे ठाणेकरांच्या हितासाठी घेतलेल्या बैठकीचे राजकीय अर्थ लावून त्याचे राजकारण करु नये असेही त्यांनी स्पष्ट केले. चार महिन्यापूर्वी सर्व नगरसेवकांना ६० लाख रु पयांचा विशेष निधी उपलब करु न देण्याकरिता मी स्वत: व आमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाशी संघर्ष केला त्यावेळी शिंदे यांनी मध्यस्थी करून सर्वपक्षीय प्रत्येक नगरसेवकांना तो विशेष निधी उपलब्ध करु न दिला. त्यावेळी तुमच्या गटनेत्यांनी हा निधी घेत असताना आमच्या नेत्यांशी बोला असे आम्हाला सांगितलेले नाही. त्यामुळे निधी घेताना आमदारांना सांगण्याची गरज वाटत नसेल तर ५ लाख रु पये निधी देताना मी नेत्यांशी व आमदारांशी चर्चा करणे संयुक्तीक वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनासाठी मुंबईतील नगरसेवकांनी पाच लाख रु पयांची तरतूद केली, आपण ही असे करू अशी चर्चा आपल्या पक्षातील नगसेवकांनी नगरसेवक ग्रुपवर सुरू केली, त्यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी महापौरांच्या मनात देखील हा विषय आहे असे सांगत याबाबत महापौरांशी चर्चा करु असे नमूद केले. मुंबई महापालिकेने नगरसेवकांना निधी वर्ग करण्याचे जे पत्र दिले त्याची प्रत पण आपल्याच नगरसेवकाने ग्रुप वर नगरसेवकांच्या माहिती साठी उपलब्ध करून दिली. तेव्हा आपल्याच पक्षातील नगरसेवकांनी होकार दिलेला आहे, त्यामुळे आता त्याला विरोध करणे अयोग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कोरोनाच्या महासंकटाचा विचार करु न सर्वपक्षीय नगरसेवकांनी नगरसेवक निधीबाबत बहुमताने घेतलेल्या निर्णयाचा आपण फेरविचार करु न राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून ठाणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून विचार करु न सहकार्य करावे. 

 

टॅग्स :thaneठाणेShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिनBJPभाजपा