शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बीएआरसीत नोकरीचे अमिष दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 21:33 IST

मुंबईतील बीएआरसीमध्ये मुलाला नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून ठाण्यातील अमृत मंडले आणि सांगलीतील रविराज चव्हाण यांच्यासह पाच जणांच्या टोळीने कोल्हापूर (कळंबा) येथील तानाजी देसाई या लष्कारातील माजी सैनिकाकडून चार लाख ७५ हजारांची रक्कम घेऊन गंडा घातला. विशषे म्हणजे बनावट बीएआरसीचे बनावट लेटरपॅड बनवून या भामटयांनी उमेदवाराची वैद्यकीय तपासणीही करुन परीक्षाही घेतली होती.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या माजी सैनिकाला गंंडवलेपाच जणांविरुद्ध ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये अर्थात बीएआरसीमध्ये मुलाला नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून अमृत मंडले (रा. सावरकरनगर, ठाणे) आणि रविराज चव्हाण (रा. वायफळे, तासगाव, जि. सांगली) यांच्यासह पाच जणांनी कोल्हापूर (कळंबा) येथील तानाजी देसाई या लष्कारातील माजी सैनिकाकडून चार लाख ७५ हजारांची रक्कम घेतली. गेल्या वर्षभरात त्यांच्या मुलाला नोकरीला न लावता पैसेही परत न केल्याने अखेर त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.अशोक शिंदे यांच्याशी २०१६ मध्ये मीरज रेल्वेस्थानकावर कोल्हापुरातील देसाई यांची भेट झाली होती. याच ओळखीतून पुढे शिंदे यांनी आपण आर्मी भरतीची अकादमी चालवित असून आपली मुंबईत ओळख आहे. त्यामुळे मानखुर्द येथील भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये तुमच्या मुलाला ओळखीने नोकरीला लावतो, असे त्यांनी अमिष दाखविले. त्यासाठी तुम्हाला आधी काही पैसे द्यावे लागतील, असेही सांगितले. त्यानंतर ठाणे येथून अमृत मंडले याने शिंदे यांच्या मार्फतीने रविराज चव्हाण यांचा ई मेल आयडी दिला. त्यावर त्यांच्या मुलाची कागदपत्रे पाठविण्यास सांगितले. पुढे चव्हाण यांनी शिंदे यांच्या मार्फतीने निरोप दिला की, त्यांचा मुलगा इंद्रजित यास भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी मिळू शकते. त्यासाठी सहा लाख रुपये द्यावे लागतील. पण वैद्यकीय तपासणीसाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील. २८ मे २०१८ रोजी त्याची वैद्यकीय तपासणीही केली. त्यासाठी त्यांनी रविराज यांच्याकडे ५० हजारांची रक्कमही दिली. विशेष म्हणजे या तपासणीसाठी रविराज याने भाभा अणुसंशोधन केंद्राचे नाव असलेले लेटरपॅडही आणले होते. या तपासणीनंतर मंडले यांच्या बँक खात्यावर त्यांनी रक्कम पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे मंडलेंच्या खात्यावर १ जून २०१८ रोजी दोन लाख रुपये आणि ५ जून रोजी २०१८ रोजी एक लाख २५ हजारांची रक्कम त्यांनी पाठविली. उर्वरित रक्कम घेण्यासाठी स्वत: मंडले, रविराज चव्हाण, विलास चव्हाण तसेच रविराज यांचे चुलते संपत चव्हाण आणि तानाजी चव्हाण असे पाच जण ठाण्यात पैसे घेण्यासाठी आले. त्यावेळी एक लाखांची रक्कम घेतल्यानंतर मुलाचा नोकरीसाठी आॅनलाईन अर्ज भरल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे परिक्षेचे हॉल तिकीट देऊन ८ जुलै २०१९ रोजी त्याची परीक्षाही घेतली. त्यात तो नापास झाल्याचे भासविले. तरीही त्याचे काम करण्यात होईल, असे सांगून या पाच जणांनी गेल्या वर्षभरात चार लाख ७५ हजारांची रक्कम घेतली. पण मुलाला कुठे नोकरीही लागली नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाही. याबाबतची त्यांनी आधी कोल्हापूरच्या राजावाडी पोलीस ठाण्यात ३ जानेवारी रोजी तक्रार दिली. हीच तक्रार आता ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात ६ जानेवारी २०२० रोजी वर्ग करण्यात आली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी