शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

एसी लोकल लादल्यास लढा आणखी तीव्र करू, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 08:53 IST

AC Local: एसी लोकलविरोधात नुकतीच झालेली आंदोलने ही प्रवाशांच्या मनातील खदखद आहे. रेल्वेने ती गांभीर्याने समजून घ्यावी, नाहीतर शेकडो प्रवाशांचे आंदोलन हजारो प्रवाशांत रूपांतरित होऊ शकते, असा इशारा माजी गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दिला.

ठाणे : एसी लोकलचे तिकीट भरमसाठ आहे. साध्या लोकलने प्रवास करणाऱ्यांना ते परवडू शकत नाही. एसी लोकलविरोधात नुकतीच झालेली आंदोलने ही प्रवाशांच्या मनातील खदखद आहे. रेल्वेने ती गांभीर्याने समजून घ्यावी, नाहीतर शेकडो प्रवाशांचे आंदोलन हजारो प्रवाशांत रूपांतरित होऊ शकते, असा इशारा माजी गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दिला. प्रवाशांच्या प्रश्नावर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीला दांडी यात्रेप्रमाणे रेल मार्च काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

गर्दीच्यावेळी साध्या लोकमलमध्ये सुमारे सहा हजार प्रवासी असतात. मात्र तेवढे प्रवाशी नेण्याची एसी लोकलची क्षमता नाही. तेवढे प्रवासी एसीत शिरले, तर ते गुदमरण्याची भीती आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गर्दीच्या वेळी एसी लोकल चालवू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले. कळव्यातील कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर त्यांनी संवाद साधला. संतप्त प्रवासी एक दिवस चालत रेल्वे ट्रॅकवरून जातील. तेव्हा काय कराल? असा सवालही त्यांनी केला. 

उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनीही प्रवाशांवर लादलेल्या एसी लोकल बंद करण्याची मागणी केली. मुंब्रा प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी ए. आर. पठाण यांनी मुंब्रा आणि कळव्यामध्ये सेमी फास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव यांच्यासह प्रवाशांनीही तीव्र भावना व्यक्त केल्या.

दाेनशे रुपये दिवसाला कसे परवडणार? कोरोना काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेल्या प्रवाशांना एसी लाेकलचे एका दिवसाचे दोनशे रुपयांचे तिकीट कसे परवडेल? एसीच्या एका लोकलमधून केवळ ६००, तर साध्या ट्रेनमधून सहा हजार प्रवासी प्रवास करतात. साध्या लोकलचा पास दोनशे, तर एसीचा महिन्याचा पास १ हजार ८०० रुपये हे कसे परवडणार, असा सवालही आव्हाड यांच्यासह प्रवाशांनी केला 

आवाजाविरोधात नोटीस द्या पारसिकच्या बोगद्यातून पूर्वी मेल-एक्स्प्रेस जात होत्या. त्यांना तो मार्ग राखून ठेवलेला असताना त्या लोकलच्या मार्गावरूनच नेल्या जातात. त्यामुळे लोकलचा खोळंबा होतो. शिवाय त्यांचा आवाज १७५ डेसिबल्सपेक्षा अधिक आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे रात्री १० नंतर ४५ डेसिबलपेक्षा अधिकआवाज नको. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्याकडे तक्रार करीत रेल्वेला याबाबत नोटीस बजावण्याचा आग्रह त्यांनी रेल्वे प्रवाशांसमोर धरला.

टॅग्स :AC localएसी लोकलMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वे