शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

जलमित्रांनी उपसला विहिरीतला गाळ

By admin | Updated: May 23, 2016 02:17 IST

डहाणू तालुक्यातील बहुसंख्य भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक जलस्त्रोतांमध्ये मृत साठा शिल्लक असून, या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी वापराविना विहिरीतला गाळ उपसून उपलब्ध पाणी

अनिरु द्ध पाटील, डहाणू/बोर्डीडहाणू तालुक्यातील बहुसंख्य भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक जलस्त्रोतांमध्ये मृत साठा शिल्लक असून, या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी वापराविना विहिरीतला गाळ उपसून उपलब्ध पाणी जंतुनाशके टाकून ते पिण्यायोग्य करणे शक्य आहे. डहाणूतील आगर आणि बोर्डीतून अशा विहिरींचा गाळ उपसण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या अभिनव योजनेचा स्वीकार केल्यास पाणीटंचाईला तोंड देता येईल, असा विश्वास उपक्रमात सहभागी जलमित्रांनी व्यक्त केला आहे. जलसाठ्याचा नियोजनबद्ध व काटकसरीने वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही. बोर्डी ते चिंचणी या किनाऱ्यालगतच्या गावांचा विचार केल्यास, या गावांमध्ये खाजगी आणि सरकारी विहिरींचे प्रमाण अधिक आहे. गेल्या काही वर्षात अनेक गावात शासकीय कूपनलिका आणि नळपाणी पुरवठ्याच्या योजना कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांकडून विहिरी दुर्लक्षिल्या गेल्या असून, बहुसंख्य विहिरी वापरावीना आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाल्याने जलसाठयांची पातळी खालावल्याने मागील काही वर्षांपेक्षा पाणीटंचाई प्रकर्षाने जाणवते आहे. त्यामुळे अशा विहिरींचे महत्व अधोरेखित झाले आहे. आजही या विहरींमध्ये जलसाठा आहे. मात्र पाण्याचा वापर होत नसल्याने पाणी दुर्गंधीयुक्त बनले आहे. या विहिरींचा गाळ उपसून जंतुनाशकाच्या सहाय्याने ते शुद्ध केले तर पिण्यालायक पाणी सहज उपलब्ध होवू शकते. महत्वाची बाब म्हणजे समुद्राला भरती आल्यास विहिरीची पाणी पातळी वाढते असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान या विहिरींचे महत्व ओळखून आगर येथील उन्नती मंडळाच्या मनेश राऊत, प्रीतेश राऊत, रितेश पाटील, नैलेश कडू, अमय कडू, सौरभ कडू, सागर कडू, विजय कडू या सदस्यांनी एकत्र येऊन उपजिल्हा रुग्णालयासमोरील दोन विहिरींतून कचरा व गाळ उपसला. बोर्डी ग्रामपंचायतीनेही गावदेवी येथील विहिरीची स्वच्छता मोहीम हाती घेऊन, विहिरीच्या काठावर जाळी बसवल्याचे उपसरपंच सुचित सावे यांनी संगितले. त्यामुळे ग्रामस्थांना विहिरीचे पाणी चोवीस तास उपलब्ध होणार आहे. भारनियमन काळात पंप बंद असले तरी हाताने उपसून पाणी काढता येईल.