शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर जाहला 'मतदार राजा जागा हो..' चा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 16:11 IST

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. 

ठळक मुद्देठाण्यातील अभिनय कट्ट्यावर जाहला 'मतदार राजा जागा हो..' चा जागरअभिनय कट्ट्यावर मतदानाविषयी जनजागृती अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी केले मतदारांना आवाहन

ठाणे : संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत.विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल..आमदार कोण?..मुख्यमंत्री कोण?..युती का आघाडी? असे अनेक प्रश्न २१ तारखेला ईव्हीएम मशीन मध्ये बंदिस्त होणार आणि २४ ला सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार.परंतु ह्या सर्व प्रश्नांची उत्तर ठरवत एक 'मत'..आपल्या सर्वांचं मत.त्या मताचं महत्व पटवून देण्याचा एक सुंदर प्रयत्न म्हणजे ४५१ अभिनय कट्ट्यावर रंगलेला प्रयोग मतदार राजा जागा हो.

   आजवर अभिनय कट्ट्यावर विविध कलाकृतीतून समाजप्रबोधन झाले. मतदान करण्याविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी.मत देण्याचा अधिकार बजावून आपण स्वतःचा आणि समाजाचा विकास साधू शकतो त्यासाठी प्रत्येकाने योग्य उमेदवाराला मतदान करून तो हक्क प्रामाणिकपणे पार पाडला पाहिजे. अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांची संकल्पना आणि आदित्य नाकती ह्यांच दिग्दर्शन असलेल्या 'मतदार राजा जागा हो...' ह्या नाट्यसादरीकरणात अभिनय कट्ट्याचे कलाकार सहदेव साळकर,महेश झिरपे,अभय पवार,रोहिणी थोरात,शुभांगी भालेकर,विद्या पवार ह्यांनी सहभाग घेतला. राज्याचा किंवा देशाचा विकास होत नाही हे बोलण्यापेक्षा आपण योग्य उमेदवार निवडून देणे आपले कर्तव्य आहे.मतदानाचा दिवस ही सार्वजनिक सुट्टी नसून आपलं कर्तव्य बजावण्याचा हक्काचा दिवस असतो, लोकशाहीचा सन्मान करण्याचा दिवस असतो.आपण सर्वांनी देखील मतदान करूया आणि एक योग्य सरकार निवडून देऊया असे आवाहन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या सोबत अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी समस्त महाराष्ट्रातील जनतेला एकाच आवाहन केले मतदार राजा जागा हो..

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूकVotingमतदान