शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील जयेशचे 'नेट सेट गो'; दृष्टीहीन असूनही नेट परीक्षेत मिळवले घवघवीत यश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 17:13 IST

net exams : ठाण्याच्या लोकमान्य नगर पाडा नंबर तीनमधील विरांश कोचिंग क्लासेसचे संचालक जयेश कारंडे यांनी पहिल्याच प्रयत्नात नेट सेट परीक्षा उत्तीर्ण केली.

ठाणे : डोळ्यावर पट्टी बांधली तर चार पावलं चालताना आपण अडखळतो. मात्र दृष्टीहीन असूनही ठाण्याच्या जयेश कारंडे यांनी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ट्वेंटी-ट्वेंटीत अर्थात नेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून दृष्टीहीन असूनही त्यांनी मिळवलेले यश डोळस समाजाला निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

ठाण्याच्या लोकमान्य नगर पाडा नंबर तीनमधील विरांश कोचिंग क्लासेसचे संचालक जयेश कारंडे यांनी पहिल्याच प्रयत्नात नेट सेट परीक्षा उत्तीर्ण केली. शालेय शिक्षण आरजे ठाकूरमधून झालेल्या जयेश यांनी एमबीए देखील पूर्ण केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जयेश हे   दृष्टिहीन असूनही त्यांनी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टच्या या 'नेत्रदीपक' यशाला गवसणी घातल्याने भविष्यात ते प्राध्यापक म्हणून रुजू होणार आहेत. त्यांच्या या कामगिरीचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी भरभरून कौतुक केले.

पाचंगे यांनी जयेश कारंडे यांनी व्यक्तिशः भेट घेत त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीबाबत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मनविसे उपशहर अध्यक्ष संदीप चव्हाण, विभाग सचिव मयूर तळेकर, उपविभागाध्यक्ष मंदार पाष्टे व शाखाध्यक्ष निखिल येवले, आकाश मोरे तसेच रोशन पाष्टे,विघ्नेश शेलार, प्रशांत पालव, विश्वजित शिंदे, अंकुश धंदर आदी उपस्थित होते.

चाळीतील घरातून आखला यशाचा महामार्गलोकमान्यनगर परिसरात दाटीवाटीने असलेल्या चाळीमध्ये जयेश राहतात. दृष्टीहीन असूनही प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश खेचून आणले. परीक्षेत रायटर घेऊन त्यांनी त्यांच्या यशाचा मार्ग आखला. 

टॅग्स :thaneठाणेexamपरीक्षा