शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला मारहाण करणा-या जयेश कोळीने दिली हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 06:04 IST

कळव्यात हॉटेलचालकाच्या भांडणामध्ये मध्यस्थी करणा-या पोलीस मुख्यालयातील, कॉन्स्टेबल श्रीकांत तळप (२६) यांना मारहाण करणारे सहा ते सात जणांचे टोळके मोकाटच आहे. त्यापैकी जयेश कोळी याला रविवारी सकाळी पकडण्यासाठी गेलेल्या पथकाला त्याने हुलकावणी दिली.

ठाणे : कळव्यात हॉटेलचालकाच्या भांडणामध्ये मध्यस्थी करणा-या पोलीस मुख्यालयातील, कॉन्स्टेबल श्रीकांत तळप (२६) यांना मारहाण करणारे सहा ते सात जणांचे टोळके मोकाटच आहे. त्यापैकी जयेश कोळी याला रविवारी सकाळी पकडण्यासाठी गेलेल्या पथकाला त्याने हुलकावणी दिली.एका हॉटेलचालकाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणारे कॉन्स्टेबल तळप यांना १४ सप्टेंबर रोजी विटाव्यातील ‘हॉटेल जय मल्हार’मध्ये मॉस्कोटो उर्फ विशाल सोनवणे याच्यासह सात ते आठ जणांनी मारहाण केली होती. त्यातील मॉस्कोटो, शैलेश चव्हाण आणि पालांडे उर्फ बाबल्या या तिघांना पोलिसांनी अटक केली.तळप हे या हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री जेवणासाठी गेले होते. तिथे मॉस्कोटो याने हॉटेलमालक अनिल शहा यांना शिवीगाळ केली. याच भांडणामध्ये तळप यांनी मध्यस्थी करून, शिवीगाळ का करतोस, असा जाब मॉस्कोटोला विचारला. त्यावर, मॉस्कोटो आणि त्याच्या साथीदारांनी तळप यांनाच मारहाण करून, कोल्ड्रिंक्सची बाटली तळप यांच्या डोक्यात मारून, त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतरही त्यांनी दगड, बांबू आणि काचेच्या बाटल्यांनी तळप व अनिल शहा यांना मारहाण केली. या टोळीतील जयेश कोळी याच्यावर कळवा आणि नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचे तीन गुन्हे दाखल आहेत.जयेश याच्यासह अजित उत्तेकर उर्फ किरशा, सूरज जाधव आणि इतर चौघांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या टोळीवर अन्य आणखी कोणत्या पोलीस ठाण्यांमध्ये कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, याचाही शोध घेण्यात येत आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून थेट पोलिसालाच या टोळक्याने दहशत पसरविण्यासाठी मारहाण केली आहे. त्यामुळे या सर्व आरोपींवर योग्य ती कडक कारवाई केली जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी सांगितले.