शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जयनाथ पूर्णेकर यांची भावासाठी माघार

By admin | Updated: February 8, 2017 04:06 IST

ठाण्यात महापौरपदाचे स्वप्ने पाहणाऱ्या भाजपाला एका मागून एक धक्के बसू लागले आहेत. आधी संजय घाडीगावकर आणि लॉरेन्स डिसोझा यांचे

ठाणे : ठाण्यात महापौरपदाचे स्वप्ने पाहणाऱ्या भाजपाला एका मागून एक धक्के बसू लागले आहेत. आधी संजय घाडीगावकर आणि लॉरेन्स डिसोझा यांचे अर्ज बाद झाले असतांना आता पक्षाला आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविणारे विद्यमान नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांना चक्क आपल्या बंधूसाठी निवडणुकीच्या रिंगणातूनच माघार घेतली आहे. भाजपाला हा आता आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.महापालिका निवडणुकीत भाजपा २५ जागेपर्यंत पोहचेल, असे चित्र आहे. परंतु, आता भाजपाला हा आकडा गाठतांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यांचे एकेक प्यादे निवडणुकीच्या शतरंजच्या खेळातून बाद होऊ लागल्याने ही संख्या गाठणेदेखील अवघड बसल्याचे चित्र आहे. छाननीच्या दिवशीच भाजपाचे कणखर नेतृत्व समजले जाणारे आणि वागळेपट्यात पालकमंत्र्यांना थेट आव्हान देऊ शकणारे अशी ज्यांची ओळख होती. ते संजय घाडीगावकर यांचा अर्ज बाद झाला, त्यानंतर सोमवारी लॉरेन्स डिसोझा जे भोईर अ‍ॅण्ड कंपनीला लढत देऊ शकणार होते त्यांचाही अर्ज बाद झाला. या दोन धक्यातून सावरत नाही तोच भाजपाला आणखी एक धक्का बसला. जयनाथ पूर्णेकर यांनी चक्क निवडणुकीच्या रिंगणातूनच माघार घेतली आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधीच पूर्णेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासमोर त्यांचे सख्ये चुलत बंधू छत्रपती पूर्णेकर हे काँंग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. भाऊबंदकी जपण्याच्या नादात भाजपाला मात्र हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. (प्रतिनिधी)