शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जवानांचे वारस लवकरच केडीएमसीच्या सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:26 IST

विहीर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले अग्निशमन दलातील जवान अनंत शेलार आणि प्रमोद वाघचौडे यांच्या वारसांना लवकरच केडीएमसीच्या सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.

कल्याण : विहीर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले अग्निशमन दलातील जवान अनंत शेलार आणि प्रमोद वाघचौडे यांच्या वारसांना लवकरच केडीएमसीच्या सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासनाची यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वारसांचा वैद्यकीय तपासणी अहवाल मिळताच त्यांना सेवेत रुजू करून घेतले जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार यांनी दिली.कल्याण पूर्वेला १ नोव्हेंबरला विहिरीत उतरलेल्या शेलार आणि वाघचौडे यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या जवानांना सुरक्षेची साधने देण्यात आलेली नव्हती, असा आरोप होत आहे. विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू ओढावल्याचा दावा संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. मात्र घटनास्थळी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भारतीय कामगार सेना या कामगार संघटनेने केली आहे. विहीर दुर्घटनेनंतर २९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एका चायनीज दुकानाला लागलेल्या आगीदरम्यान झालेल्या सिलिंडर स्फोटात कर्तव्यावर असलेले लिडिंग फायरमन जगन आमले यांचा मृत्यू झाला होता.नेमणुकीबाबत प्रस्ताव तयारविहिर दुर्घटनेची चौकशी सुरू असून शेलार आणि वाघचौडे यांच्या वारसांना महापालिका सेवेत रुजू करून घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केली आहे.वाघचौडे यांच्या पत्नी दीपा यांचीअनुकंपातत्त्वावर महापालिकेच्या आस्थापनेवर मंजूर व रिक्त असलेल्या लिपिक टंकलेखक तथा संगणकचालक या पदावर नेमणूक प्रस्तावित आहे.शेलार यांचा मुलगा जयेश शेलार याचीदेखील लिपिक तथा संगणकचालक या पदावर नेमणूक केली जाणार आहे.दोघांचेही नेमणुकीचे प्रस्ताव तयार असून त्यांना वैद्यकीय तपासणी अहवाल, पोलिसांचा चारित्र्य पडताळणी दाखला सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका