शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

जास्वंदी, मोगरा गेला ‘भावखाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 03:29 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या फुलबाजारात गणेशोत्सवानिमित्त बुधवारी तुफान गर्दी उसळली होती.

- मुरलीधर भवार कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या फुलबाजारात गणेशोत्सवानिमित्त बुधवारी तुफान गर्दी उसळली होती. फुलांचे दर दररोजच्या तुलनेत बºयापैकी चढे असले, तरी सर्वाधिक ‘भावखाऊन’ गेलाय तो मोगरा. गणेशमूर्तीच्या मुकुटावर शोभून दिसणारे जास्वंदीचे फुल चांगलेच महागले आहे. अर्थात दर चढे असले, तरी भाविकांनी कोट्यवधी रुपयांच्या फुलांची खरेदी केली.फुलविक्रेते विलास कसबे यांनी सांगितले की, फुलांचे भाव फारसे वाढलेले नाही. पण, या मोसमात मोगºयाची फुले कमी येतात. त्यामुळे स्थानिक फुलशेती करणाºयांकडून मोगरा कमी येतो. गणेशोत्सवासाठी बाजारात बंगळुरू व हैदराबाद येथून मोगरा विक्रीसाठी आला आहे. गणेशोत्सवापूर्वी मोगºयाचा दर एक किलोला ३०० ते ४०० रुपये होता. आज बाजारात त्याच मोगºयाची फुले १५०० ते १६०० रुपये किलो दराने विकली गेली. मोगरा सर्व फुलांच्या तुलनेत भावखाऊन गेला आहे. गणेशाला जास्वंदीचे फुल आवडते. त्यामुळे जास्वंदी फुलाची एक पुडी ४०० रुपये दराने विकली गेली. एका पुडीत ६० जास्वंदीच्या कळ्या होत्या. जास्वंदी फुलाला एरव्ही इतकी मागणी नसते. चायनीज गुलाब हा १२० रुपये दराने विकला गेला. साध्या गुलाबाचा भाव एका डझनला ५० ते ६० रुपये होता. काल आणि आज फुलांचा बाजार तेजीत होता. आणखी दोनतीन दिवस बाजारात फुलांचे दर चढे राहतील.फुलविक्रेते नितीन तांबे यांनी सांगितले की, यंदा फुलांच्या भावात फार वाढ झालेली नाही. यंदा बाजारात आवक चांगली असल्याने मोठी भाववाढ नाही. मागच्या वर्षी पावसामुळे फुले भिजलेली आली होती. त्यामुळे मागच्या वर्षी फुलांचे दर जास्त होते व दर्जाही तितकासा चांगला नव्हता.>फुलांचे दरझेंडू- ३० ते ४० रुपये किलोशेवंती- १०० ते १२० रुपये किलोगुलछडी- २४० रुपये किलोअष्टर- १०० ते १२० रुपये किलोजरबेरा- ५० ते ६० रुपये एक बंडललीली- ४०० रुपये एक बंडलचायनीज गुलाब- १०० ते १२० रुपये २० नगसाधा गुलाब- ५० ते ६० रुपये एक डझनजास्वंदी- ४०० रुपये एक पुडी (६० कळ्या)मोगरा- १५०० ते १६०० रुपये किलो

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सव