शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाला डबल लॉटरी; प्रो गोविंदाच्या 3 लाखांसह, 9 थरांचे 5 लाखही जिंकले 

By जितेंद्र कालेकर | Updated: August 20, 2022 01:17 IST

११ प्रो गोविंदांच्या थरांच्या कसरत ठाणेकरांनी शुक्रवारी अनुभवली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहिहंडीला हजेरी लावून गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला.

ठाणे: अचूक वेळेत थर लावणे आणि तो पुन्हा तसाच उतरविणे, अशा प्रो गोविंदाच्या तीन लाख रुपयांच्या बक्षिसासह, नऊ थर यशस्वीपणे लावून सलामी देणाऱ्या मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाने पाच लाखांचे बक्षीसही जिंकले आहे. अशा प्रकारे, जय जवान गोविंदा पथकाने एकूण एकूण आठ लाखांचे पारितोषिक जिंकले आहे.

११ प्रो गोविंदांच्या थरांच्या कसरत ठाणेकरांनी शुक्रवारी अनुभवली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहिहंडीला हजेरी लावून गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला.

डीजेच्या तालावर आणि पावसाच्या रिमझिममध्ये सकाळी ११.३० वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत आमदार प्रताप सरनाईक आयोजक असलेल्या वर्तकनगर येथील ठाणे महापालिका शाळेच्या मैदानावर मुंबई ठाण्यातील गोविंदा पथकांचा अमाप उत्साह पहायला मिळाला. याठिकाणी मुंबई ठाण्यातील १४७ गोविंदा पथकांनी रात्री १० वाजेपर्यंत हजेरी लावली.  

प्रो गोविंदामध्ये यांनी आणली रंगत-रात्री ८ वाजेनंतर ठाण्याचा राजा, खोपटचा राजा आणि सहयोग गोविंदा पथक या ठाण्यातील तीन गोविंदा पथकांनी नियोजनबद्धपणे थर लावून उपस्थितांची मने जिंकली. तर मुंबईतील जोगेश्वरीच्या जयजवान, आर्यन्स गोविंदा, हिंदू एकता गोविंदा, कोकण नगर, सांताक्रूझच्या विघ्नहर्ता गोविंदा तसेच वडाळयाच्या अष्टविनायक गोविंदा आणि यश गोविंदा पथक तर चेंबूरच्या बालवीर गोविंदा पथकांनी अत्यंत शिस्तबद्धपणे मानवी थर लावून नेत्रदिपक मनोरे रचले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानचे पूर्वेश सरनाईक, स्थानिक नगरसेवक राजू फाटक तसेच पदाधिकाºयांसह इतर गोविंदांनी पथकांनी मनोरे रचणाºया गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना टाळया वाजवून  प्रोत्साहन दिले. यावेळी महिला गोविंदा पथकांनीही चित्तथरारक मनोरे रचून उपस्थितांची दाद मिळविली.

या गोविंदांनी केली बक्षीसांची लयलूट-यावेळी मुंबईतील महिलांच्या पार्ला गोविंदा पथकाने सात थर लावून  तर बोरीवलीच्या शिवसाई गोविंदा  (पुरुष) पथकाने आठ थर लावून प्रत्येकी २५ हजारांचे बक्षीस जिंकले. याशिवाय, १७ पथकांनी सहा थर, १८ पथकांनी पाच थरांची सलामी यावेळी दिली. यामध्ये मुंबई आणि ठाण्यातील प्रत्येकी एका गोविंदा पथकाचा समावेश होता.

दिवसभरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हजेरीमुळे या भागाला गोविंदाप्रमाणेच पोलीस छावणीचेही स्वरुप आल्याचे चित्र होते. 

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीthaneठाणेMumbaiमुंबई