शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

याला म्हणतात नशीब! कोरोनावर मात करून बाहेर काय आला; व्यावसायिक पाच कोटींची लॉटरी जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 01:24 IST

कोरोनावर मात केल्यानंतर सुखद धक्का , दिवा-दातिवली रस्त्याजवळील ओमकार सदन या इमारतीमध्ये आई, पत्नी आणि दोन मुलांसह राजकांत राहतात. उद्योजक पाटील यांनी दीड महिन्यांपूर्वी पंजाब राज्यातील लॉटरीची १०० रुपयांची १० तसेच ५०० रुपये किमतीची दोन तिकिटे अशी एकून दोन हजार रुपयांची १२ तिकिटे ऑनलाईन खरेदी केली होती.

कुमार बडदेलोकमत न्यूज नेटवर्क मुंब्रा : कोरोनाच्या आजारातून घरी परतलेल्या ठाणे जिल्ह्यातील दिव्यातील एका लघुउद्योजकाला तब्बल पाच कोटी रुपयांची लॉटरी लागल्याने सुखद धक्का बसला आहे. कोरोनामुळे अनेक व्यावयासिक, उद्योजक, नोकरदार आर्थिक अडचणीत आले असताना लॉटरीने मालामाल झालेले राजकांत पाटील व त्यांचे कुटुंबीय यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

दिवा-दातिवली रस्त्याजवळील ओमकार सदन या इमारतीमध्ये आई, पत्नी आणि दोन मुलांसह राजकांत राहतात. उद्योजक पाटील यांनी दीड महिन्यांपूर्वी पंजाब राज्यातील लॉटरीची १०० रुपयांची १० तसेच ५०० रुपये किमतीची दोन तिकिटे अशी एकून दोन हजार रुपयांची १२ तिकिटे ऑनलाईन खरेदी केली होती. यातील ५०० रुपये किमतीच्या एका तिकिटीला बक्षीस लागले आहे. वैशिष्ट्य म्हणजे ज्या दिवशी लॉटरीचा निकाल लागला (१९ एप्रिल), त्याच दिवशी दुपारी पाटील कोरोनावर उपचार घेऊन बरे होऊन घरी आले होते. त्यामुळे त्यांच्या अंगात त्राण नव्हते. मात्र, आपल्याला थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल पाच कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे कळल्यानंतर त्यांच्या आनंदला पारावार उरला नाही. लॉटरी लागल्याचे क‌‌‌ळल्यावर सर्वप्रथम त्यांचा विश्वास बसला नव्हता. कोणीतरी मस्करी करत असेल असे समजून त्यांनी पहिल्यांदा फोन कट केला. त्यानंतर काही क्षणांनी पुन्हा त्यांना बक्षीस लागल्याचा फोन आल्यानंतर त्यांची खात्री पटली. नशीब आजमावायचे म्हणून कधीतरी लॉटरी काढण्यास हरकत नाही; परंतु आहारी जाऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला.

कायदेशीर व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणारकोरोना महामारीने अनेक जण बेरोजगार झाले, व्यावसायिकदेखील डबघाईला आल्यामुळे भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील आयुष्य कसे जगायचे, संसाराचा गाडा कसा हाकायचा, अशी चिंता हजारो कुटुंबांना सतावत आहे. अशा वेळी लागलेल्या या बक्षिसामुळे पाटील कुटुंबाला निश्चितच आनंद झाला असून, बक्षिसातून मिळणारी रक्कम भविष्यात कायदेशीर व्यवसायांमध्ये गुंतविण्याचा मानस असल्याची माहिती पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस