शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श आचारसंहितेच्या तक्रारीची अवघ्या तासाभरात घेतली जाणार दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 22:57 IST

एखाद्या राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळले तर ‘सी व्हीजिल’ या अ‍ॅपद्वारे मतदारांनाही नजर ठेवता येणार आहे. या तक्रारीवर तासाभरातच आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बागल यांनी रविवारी दिली.

ठळक मुद्देमतदारांना ‘सी व्हीजिल’ अ‍ॅपद्वारे ठेवता येणार नजरकोणत्याही नागरिकाला करता येणार तक्रार निवडणूक निर्णय अधिका-यांनी दिली माहिती

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी आता आदर्श आचारसंहिता लागू झाली असून एखाद्या राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळले तर ‘सी व्हीजिल’ या अ‍ॅपद्वारे मतदारांनाही नजर ठेवता येणार आहे. यातून कोणाही नागरिकाने तक्रार केली तर त्याची तत्काळ दखल घेऊन तासाभरातच तक्रारीवर आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बागल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.आदर्श आचारसंहितेचे राजकीय पक्षांकडून किंवा संबंधित उमेदवारांकडून काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही, याबाबत मतदारराजालाही करडी नजर ठेवता येणार आहे. त्यासाठी आपल्या मोबाइलद्वारे सी व्हीजिल अर्थात सिटीजन व्हीजिल हे अ‍ॅप डाउनलोड केल्यास कोणालाही, कोणत्याही ठिकाणावरून थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणच्या प्रचाराबाबतचे वेगळे फोटो किंवा व्हिडीओ आढळल्यास ते याठिकाणी पाठवता येतील. ते फोटो जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाकडे पाठविले जातील. याची माहिती तातडीने भरारी पथकाला दिली जाईल. ओवळा-माजिवडा मतदारसंघासाठी अशा चार भरारी पथकांची नियुक्ती झालेली आहे. साधारण २० ते २५ मिनिटांमध्ये हे पथक तिथे पोहोचल्यानंतर एका तासात यासंदर्भातील कार्यवाही ते करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आचारसंहिताभंगाबाबतचे कोणतेही गैरप्रकार आढळल्यास ते तातडीने या अ‍ॅपद्वारे अथवा थेट निवडणूक निर्णय अधिका-यांकडेही नोंदविल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाणार असल्याचे बागल यांनी सांगितले............................मतदारयादीत अजूनही नाव नोंदवू शकताएखाद्याचे नाव गेल्या निवडणुकीच्यावेळी गहाळ झाल्याचे आढळले असेल, तर त्यांनी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे याबाबतची चौकशी करावी. लोकसभा २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी ज्यांची नावे होती, तीच यादी आता विधानसभेलाही असेल. पण, ज्यांची नावे त्यावेळी नव्हती. पत्ते बदलले असतील, अशा मतदारांनी ६ क्रमांकाचा अर्ज भरून द्यायचा आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी हे अर्ज देण्याची मुदत आहे. त्यामुळे अजूनही मतदार आपले नाव मतदारयादीत नोंदवू शकतात, असेही बागल यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगovala-majiwada-acओवाला मजिवाडा