शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील १४० खासगी रुग्णालयांकडे फायर एनओसी नसल्याचे झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 00:36 IST

भंडारा दुर्घटना : ठाणे अग्निशमन दलही करणार कारवाई, सुरक्षेचा प्रश्न ऐर‌णीवर

ठाणे : भंडारा जिल्ह्यात झालेला प्रकार अत्यंत खेदजनक असून राज्यात अशी अनेक असुरक्षित रुग्णालये आहेत. भंडारा जिल्ह्यासारखी पुनरावृत्ती ठाण्यातही होण्याची भीती व्यक्त होत आहे. ठाण्यातील तब्बल १४० खासगी रुग्णालयांकडे फायर एनओसी नसल्याचे वास्तव समोर आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये अग्निशमन दलाकडून पुन्हा अशा रुग्णालयांचा आढावा घेतला जाणार असून त्यांना कारवाईची नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्यातील खासगी रुग्णालयांना फायर एनओसी नसल्यामुळे अशी नामांकित १४० रुग्णालये ४८ तासांची नोटीस देऊन सील करण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाला न्यायालयाने दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे ही सर्व रुग्णालये आजही सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी याबाबत काही कार्यकर्त्यांनी अग्निशमन अधिकारी आणि महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली असता तीन रुग्णालये सील केली. मात्र, काही तासात ती पुन्हा खुली करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

ठाणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यासंदर्भात म्हणाले की, २०१९ मध्ये न्यायालयाच्या आदेशाने अग्निसुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. यातील काही रुग्णालयांनी अटीशर्थींचे पालन केल्यामुळे त्यांना फायर एनओसी देण्यात आले आहे. परंतु, यातील किती जणांनी घेतले आणि किती बाकी आहेत, याचा आढावा घेतला नसल्याचीही त्यांनी कबुली दिली. तो आढावा घेण्यात येणार असून उर्वरित रुग्णालयांना पुन्हा नोटीस बजावली जाणार आहे.

जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा यंत्रणा भक्कमठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय आणि ठाणे महानगरपालिकेचे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणा सक्षम आणि पुरेशा असल्याचा दावा या रुग्णालयांनी केला आहे. जिल्हा रुग्णालयाची आगरोधक सुरक्षा यंत्रणा भक्कम असून तिची वेळेवर दुरुस्ती आणि लेखापरीक्षण केले जाते. रुग्णालयातील सर्व सिलिंडरचे फेब्रुवारी महिन्यात रिफिल केले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सध्या येथे उपचार केले जातात. या रुग्णालयात बालकांसाठी १६ खाटांची सुविधा असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेfireआग