शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

कामावर जाण्यासाठी लागतात पाच ते सहा तास, दिवेकरांचे हाल सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 15:41 IST

अनलॉक सुरु झाला आणि शासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये जाण्यासाठी चाकरमान्यांची धावपळ सुरु झाली आहे. दिव्यात अनेक चाकरमानी वास्तव्यास असून त्यांची आता कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी तारेवरची कसरत सुरु झाली आहे. कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांना पाच ते सहा तासांचा कालावधी जात आहे.

ठाणे : अनाधिकृत बांधकाम, पाणी, लोकलची अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या दिव्यातील नागरिकांना अनलॉक नंतर नवीन समस्येला तोंड द्यावे लागते आहे. आपल्या पोटापाण्यासाठी ठाणे मुंबईसारख्या शहरात कामावर जाताना रोज सहा ते सात तास आपला जीव मुठीत घेऊन येथील चाकरमान्यांना प्रवास करावा लागत आहे. लोकल सेवा नसल्याने अतिशय कमी वाहतुकीच्या पर्यायामुळे आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे. पहाटे पाच पासून बसच्या रांगेत उभे राहावे लागत असून कामावर जाण्यास ९ ते १० वाजत आहेत. त्यातही उशिरा पोहचल्यास लेट मार्क किंवा गैरहजेरी लावली जात आहे.               दिव्यातील लोकांना मुंबईत कामावर जायचे असेल तर एकमेव आधार म्हणजे लोकल ट्रेनचा. मात्र सरकारने लॉक डाऊनचे नियम शिथिल केल्यापासून खाजगी आणि सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात जे दिवेकर कामाला जाण्यास निघत आहे, त्यांना रस्ते वाहतुकी शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. आधी टीएमटी बस आणि त्यानंतर बेस्टच्या बसेस मधून प्रवास करत त्यांना आॅफिस गाठावे लागत आहे. या बसेस मध्ये चढण्यासाठी दिव्यात तब्बल एक ते दीड किलोमीटरच्या रोजच रांगा लागत आहेत. सकाळी पाच वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे असतात. सोशल डिस्टेसींगचे नियम पाळून बस मध्ये बसवले जाते. त्यामुळे अधिक गर्दी, भांडणे, मारामारी इथे रोज होत असते. टीएमटी बस मधून ठाण्यापर्यंत आल्यानंतर पुन्हा बेस्टच्या बसची वाट बघून त्यातून मुंबईतील आॅफिस पर्यंत पोचावे लागते. हीच कसरत घरी येताना देखील करावी लागते. आॅफिसमध्ये वेळेत न गेल्याने कधी लेट मार्कतर कधी थेट गैरहजेरी लावली जाते असल्याचे येथील चाकरमान्यांचे म्हणने आहे.दरम्यान दिवा ते ठाणे अशा टी एम टी बसेसच्या एकूण ४० फेऱ्या चालवल्या जात आहेत. त्यातील दिवा येथून ठाण्यात येणाऱ्या २० फेऱ्या, ठाणे येथून दिव्याला जाणाऱ्या ११ फेऱ्या आणि आनंद नगर डेपो येथून दिव्याला जाणाऱ्या ८ फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र त्या देखील अपुऱ्या पडत असल्याचे चारकमानी सांगतात. त्यामुळे पहिल्या बसमध्ये जागा मिळावी आणि पुढे ठाण्यातून बेस्ट बस वेळेत मिळावी यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून येथे बस मिळविण्यासाठी चाकरमानी रांगा लावत असतात. एकीकडे कोरोना चे संकट तर दुसरीकडे पोट भरण्यासाठी कामावर जाण्याची मजबुरी, त्यामुळे दिव्यातून जास्तीत जास्त बसेस सोडण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. सरकारने कामावर जाण्यास मुभा तर दिली, मात्र त्यासाठी किती अपरिमित कष्ट नागरिकांना घ्यावे लागत आहेत याचा थांगपत्ता देखील सरकारला नाही.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या