शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

माझी लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरायला लागतोय एक तास

By अजित मांडके | Updated: July 12, 2024 15:37 IST

सर्व्हर डाऊन, ओटीपीवरुन अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांमध्ये मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. त्याचा फायदा शहरातील त्या त्या भागात वास्तव्यास असलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना होत आहे. यात अर्जदार महिला या आॅफलाईन पध्दतीने अर्ज भरत आहेत. तो अर्ज पालिकेच्या मदत कक्षात आल्यानंतर अंगणवाडी सेविका आॅनलाईन भरत आहेत. परंतु एक एक अर्ज भरण्यासाठी तब्बल १ ते दिड तासांचा कालावधी जात असल्याने अंगणवाडी सेविकांसह पालिका अधिकारी वर्ग हैराण झाला आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहिण योजना राबविली आहे. यात प्रत्येक लाभार्थी महिलेला महिनाकाठी दिड हजार मिळणार आहेत. त्यानुसार महापालिका हद्दीतील महिलांना देखील या योजनेचा लाभ व्हावा या उद्देशाने ठाणे महापालिकेने देखील पावले उचलली आहेत. गुरुवार पासून महापालिकेने या योजनेतील महिलांचे अर्ज भरण्यास सुरवात केली आहे. परंतु पहिल्याच दिवसापासून अर्ज भरतांना अंगणवाडी सेविकांची तारेवरची कसरत सुरु झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. यात आर्थिक दुर्बल घटकातील महिला या आपआपल्या भागातील माजी नगरसेवकांच्या कार्यालयात जाऊन किंवा महापालिकेच्या संबधींत कार्यालयात जाऊन अर्ज घेत आहेत. त्यानंतर तो अर्ज आॅफलाईन पध्दतीने भरुन पुन्हा पालिकेच्या संबधीत मदत कक्षात आणून देत आहेत. त्यानंतर महापालिकेच्या अंगणवाडी सेविका हा अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरण्याचे काम गुरुवार पासून करीत आहेत.

परंतु पहिल्या दिवसापासून अंगणवाडी सेविकांना आॅनलाईन पध्दतीने अर्ज भरतांना अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. सर्व्हर डाऊन होणे, सर्व्हर स्लो होणे, आदी समस्यांमुळे एक एक अर्ज आॅनलाईन भरण्यासाठी तब्बल १ ते दिड तासांचा अवधी जात आहे. परंतु आॅफलाईन पध्दतीने येणाºया अर्जांची संख्या रोजच्या रोज शेकडो असल्याने आलेले अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरण्यासाठी तारेवरची कसरत सुरु आहे. त्यातही अर्ज भरुन झाल्यानंतर संबधीत अर्जदार महिलेच्या मोबाइलवर ओटीपी जात आहे. तो ओटीपी मागतांना देखील कशाला हवा ओटीपी, तुम्ही फसवणुक कराला अशा देखील तक्रारी वाढू लागल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले. त्यामुळे या अडचणी दूर व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Womenमहिला