शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सामंजस्यातून वैर मिटविणे गरजेचे

By admin | Updated: June 30, 2017 01:10 IST

सामंजस्यातून वैर मिटविणे गरजेचे

खेडी प्रगत झाल्याशिवाय देश प्रगतीपथावर आगेकूच करू शकणार नाही. निसर्गाची अनुकूल साथ मिळाली तर खेड्यातील गरीब व सर्वसामान्य शेतकरी काबाडकष्टातून, आपल्या शेतीतील उत्पादनांमधून सोनं प्राप्त करण्याची मनिषा बाळगू शकतो. दुर्दैवाने हाच शेतकरी बांधाची जमीन, शेतातील पीक किंवा भाऊबंदकीच्या वादातून कोर्टकचेरीच्या दुष्टचक्रात अडकतो. याचाच परिणाम म्हणून कुटुंब व्यवसाय व शेतीकडे दुर्लक्ष होऊन त्या शेतकऱ्याची प्रगती खुंटते. त्यामुळे आपापसातील मतभेद व वैरभावामुळे स्वत:ची कुटुंबाची व पर्यायाने सामाजिक हानी होण्यापेक्षा तंटा होऊच नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तंटा वा भांडण करता येत नाही, यासाठी नव्हे तर सामाजिक एकोपा क्षुल्लक कारणावरून दुभंगला जाण्यापेक्षा परस्पर सामंजस्यातून वैर मिटविण्यासाठी ‘महात्मा गांधी तंटामुक्त अभियान’चा प्रसार व प्रचार व्हायला हवा, असे मत रत्नागिरी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी ‘लोकमत’शी थेट संवादात बोलताना व्यक्त केले.प्रश्न : तंटामुक्त अभियानाबाबत आपण काय सांगाल?उत्तर : आम्हाला हिंसा करता येत नाही, म्हणून आम्ही अहिंसेचा अंगिकार केलेला आहे, यात मुळीच तथ्य नाही. हिंसेचा प्रतिकार अहिंसेच्या शस्त्राने प्रभावीरित्या करता येणे शक्य आहे, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रपिता महात्मा गांधी करत असत. आपापसातील मतभेद व वैरभावामुळे स्वत:ची, कुटुंबाची व पर्यायायाने सामाजिक हानी होण्यापेक्षा तंटा होऊच नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सामाजिक एकोपा क्षुल्लक कारणावरून दुभंगला जाण्यापेक्षा परस्पर सामंजस्यातून वैर मिटविण्यासाठी २००७ साली तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रश्न : तंट्याची नेमकी कारणे काय सांगाल?उत्तर : प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कायद्याचे ज्ञान हे अन्यायाविरूद्ध लढा देण्यासाठी अमृत ठरावे. परंतु, प्रत्यक्षात जमीन, पाणी व इतर हक्कांवरून सख्खे भाऊ तसेच शेजारी परस्परांचे वैरी बनतात. परस्परांमधील सुसंवादाचा अभाव, अहंकार आणि तथाकथित सामाजिक प्रतिष्ठा यामुळे माघार कोणी घ्यायची, यावर गाडे अडून बसते व त्याचाच वैरभाव वाढत जातो.प्रश्न : पिढ्यान्पिढ्या हे वाद वाढतच राहण्याचे कारण काय?उत्तर : दोन व्यक्तींमधील वैर प्रथम दोन कुटुंबात व नंतर समूह, जात, धर्म व सांप्रदायिक रूपात बदलत जाते. सुखासमाधानाने एकत्रित नांदणारी कुटुंब व गावे एकमेकांकडे संशयाने बघू लागतात. परस्परांचे नावसुद्धा न घेणे किंवा चेहरा न बघण्याइतपत द्वेष मनात भरतो. हाच द्वेष पुढील पिढ्यात वारसाहक्काने संक्रमित होत जातो. त्यामुळेच पिढ्यान्पिढ्या हे वाद सुरू रहात असल्याचे दिसून येते.प्रश्न : या अभियानातून कोणत्या स्वरूपाचे तंटे मिटविण्यासाठी प्रयत्न केले जातात?उत्तर : प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, दाखल झालेले तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे असे या अभियानाचे तीन प्रमुख टप्पे आहेत. तीनही टप्प्यात या अभियानाला लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होणे अपेक्षित आहे. केवळ एक सरकारी योजना म्हणून नव्हे तर तंटामुक्त गावाच्या निर्मितीतून प्रगतीच्या राजमार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून तंटामुक्त गावांना समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येते.प्रश्न : गाव तंटामुक्त होऊच नये, अशी मानसिकता आहे का?उत्तर : गावांमध्ये निर्माण होणारे तंटे जमिनीच्या वादातूनच अधिक असतात. सुरूवातीला कवडीमोल वाटणाऱ्या जमिनीला आता सोन्याचा भाव आल्याने जमिनीच्या हक्कासाठी प्रत्येकजण भांडत आहे. त्यातूनच तंट्यांचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे.प्रश्न : हे तंटे कमी होण्यासाठी नेमके काय करणे गरजेचे आहे?उत्तर : लोकांची मानसिकता बदलणे खूप गरजेचे आहे. छोट्याशा वादातून द्वेषाची भावना वाढीला लागत आहे. त्यातूनच तंटे अधिक प्रमाणात घडत आहेत. तंटा हाच एकमेव पर्याय आहे, असेच सर्वांना वाटत आहे. लोकांमध्ये असलेला हा गैरसमज दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करून गावातील तंटे अधिकाधिक कमी करण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.प्रश्न : रत्नागिरी जिल्ह्यात अभियानाबाबत इतकी उदासिनता का?उत्तर : मुळात कोकणातील बहुतांश जनता मुंबईसारख्या शहरात राहते. त्यामुळे गावी राहणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. गावातील तंटे सामोपचाराने मिटविण्यासाठी प्रयत्न करत असताना मुंबईस्थित व्यक्तींचा तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातही या अभियानाचे काम उत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्न केले जातील. या अभियानातही आपला जिल्हा अग्रेसर राहिल्याचे दिसून येईल. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणाही राबवण्यात येईल. जिल्ह्यात अजूनही अनेक गावे तंटामुक्त होणे बाकी आहे, ही गावे तंटामुक्त होण्यासाठी ग्रामस्थांची मानसिकता बदलून यासाठी त्यांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे. - अरुण आडिवरेकर