शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

भाताच्या तुसाच्या गोण्यांआड खैराची तस्करी होत असल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 23:56 IST

भिवंडीत वनविभागाची कारवाई : १४ लाखांचा मुद्देमाल जप्त 

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भाताच्या तुसाच्या गोण्यांच्याआड खैर लाकडांची तस्करी करणाऱ्या ट्रकवर ठाणे वन विभागाने भिवंडीनजीक रविवारी रात्री कारवाई केली आहे. या कारवाईत ट्रक आणि खैराच्या लाकडांसह १४ लाखांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला आहे. पडघा वनक्षेत्रपाल संजय धारवणे हे रविवारी रात्री गस्त घालत असता त्यांना खबऱ्यामार्फत भिवंडीतील वडपा परिसरात मुंबई - नाशिक महामार्गावर एक संशयित वाहनातून खैराच्या लाकडांची तस्करी करत असल्याची माहिती समजली. त्यानुसार त्यांनी ठाण्यातील उपवन संरक्षक गजेंद्र हिरे व मांडवी येथील उपविभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांना याबाबत माहिती दिली. गस्तीदरम्यान वडपा हद्दीत शंग्रीला हॉटेलजवळ  एक संशयित वाहन उभे असल्याचे दिसून आहे. धारवणे हे या संशयित वाहनाची तपासणी करण्यासाठी जात असताना वाहनचालकास संशय आल्याने त्याने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास काही अंतरापर्यंत पाठलाग करून पकडण्यात आले. दरम्यान, चालकाने धावत्या गाडीतून उडी मारून पलायन केल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई हिरे व देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, धारवणे यांच्या नेतृत्त्वाखाली वडपा वनपाल विलास निकम, दिनेश माळी, वनपाल साहेबराव खरे, वनरक्षक जमीर इनामदार, विनोद सिल्व्हेरी, भाऊसाहेब आंबुर्लरकर, कार्यालयीन वनरक्षक संदीप पाटील, पडघा रेंज कार्यालयाचे लेखापाल पंकज जाधव, पडघा रेंज कार्यालयीन कर्मचारी महेंद्र भेरे, वाहनचालक  विकास उमतोल, वनमजूर भगवान सवर यांनी केली आहे.