शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा चाळींचा मुद्दा स्थायी समितीमध्ये गाजला, शिवसेनेकडून गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 02:43 IST

कोरीयन कंपनीच्या माध्यमातून सापर्डे उंबर्डे परिसरात राबविण्यात येणाऱ्या विकास योजनेच्या प्रस्तावित जागेवर उभारलेल्या बेकायदा चाळींचा मुद्दा मंगळवारी महापालिका स्थायी समितीच्या सभेत गाजला.

कल्याण - कोरीयन कंपनीच्या माध्यमातून सापर्डे उंबर्डे परिसरात राबविण्यात येणाऱ्या विकास योजनेच्या प्रस्तावित जागेवर उभारलेल्या बेकायदा चाळींचा मुद्दा मंगळवारी महापालिका स्थायी समितीच्या सभेत गाजला. शिवसेनेकडून या मुद्यावर गंभीर आरोप केले जात असताना, या प्रश्नावर प्रशासनाची बाजु मांडण्यासाठी संबंधित अधिकारीच उपस्थित नसल्याने स्थायी समिती सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंगळवारच्या अंकात लोकमतने या मुद्यावर बातमी प्रसिद्ध केली.सापार्डे आणि वाडेघर येथील विकास परियोजनेचे खासगी संस्थेतर्फे सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत चर्चेला आला. मे. पी. एन. शिदोरे यांना ६८ हजार रुपये खर्चाचे काम देण्याचा हा ठराव होता. याच जागेवर बेकायदा बांधकामे झाल्याचा मुद्दा नगरसेवक जयवंत भोईर यांनी उपस्थित केला. त्यामुळे सर्वेक्षण करुन उपयोग काय, असा सवालही त्यांनी केला. बेकायदा बांधकामाच्या मुद्यावर अधिकारी वर्गाकडून ठोस कारवाई होत नसल्याने सभापती राहूल दामले उद्विग्न झाले. बेकायदा बांधकाम करणाºयाना कोणतेही नियम नाहीत. अधिकृत काम करणाºयांनाच सर्व नियम लावले जातात. बेकायदा बांधकामे रेग्युलराईज झाली असून, अधिकृत बांधकाम करणाºयांना एमआरटीपी अ‍ॅक्ट लागू करण्याचा प्रस्ताव महासभेसमोर मांडला जाईल. हा प्रस्ताव मांडल्यावर लाजेने का होईना, अधिकारी बेकायदा बांधकाम प्रकरणी ठोस कारवाई करतील. ही मागणी उपरोधिक असली तरी नाईलाज असल्याचे दामले यावेळी म्हणाले.सभापतींची रि ओढत भाजप नगरसेवक मनोज राय यांनी सांगितले की, कल्याण पश्चिमेत डीपी रोडमध्ये एक मंदिर बांधले आहे. त्याच्या विरोधात कारवाईची मागणी आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या काळापासून केली आहे. २०१२ पासून आजपर्यंत त्याविरोधात कारवाई केलेली नाही. रस्ते विकासाच्या आड येणारी बेकायदेशीर धर्मिक स्थळे आणि मंदिरे हटविण्याचे आदेश उच्च न्यायलयाने देऊनही त्याकडे कानाडोळा केला. नगरसेविका माधुरी काळे म्हणाल्या, एका व्यक्तीने गटार बंद केले असून, त्याच्या विरोधात महापालिकेचे अधिकारी कारवाई करीत नाही. या चर्चेपश्चात उपायुक्त पवार यांना बोलावण्यात आले. त्यानंतर भोईर यांनी पुन्हा बेकायदा चाळींचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपायुक्त पवार यांनी प्रशासनाची बाजु मांडली. बेकायदा चाळी उभारल्या जात असतील तर कारवाई करता येईल; मात्र ज्या चाळीत लोक वास्तव्याला असतील त्या चाळीवर कारवाई करता येणार नाही असे उपायुक्त म्हणाले.२७ गावातील रस्ते आणि आरक्षणे यांचे सर्वेक्षण करण्याचे काम खासगी कंपनीला दिले आहे. हे काम दोन कोटी ५९ लाख रुपये खर्चाचे आहे. या कामाला मंजुरी देण्यावरुन शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले असता सभापती व म्हात्रे यांच्यात शाब्दीक चकमक उडाली.आरक्षणावर बांधकामे होणार नाहीतमुख्यमंत्र्यांनी २७ गावे वेगळी करुन स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन दिले असले तरी, महापालिकेकडून २७ गावांतील रस्ते व आरक्षणे यांचे सर्वेक्षण करण्याचा विषय मंजूर केला जात आहे. २७ गावे महापालिकेत राहतील अथवा नाही. मात्र भविष्याच्या दृष्टीने रस्ते व आरक्षणे यांचे सर्वेक्षण झाले तर पुढील काळात डीपी रोड आणि आरक्षणावर बांधकामे होणार नाहीत आणि झालेली काढता येईल असे स्पष्टीकरण सभापतींनी दिले. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाnewsबातम्या