ठाणे / मुंब्रा : मुंब्य्रात चार वर्षांपासून सुरू असलेल्या शहीद इशरत जहाँ या नावाच्या रुग्णवाहिकेचे छायाचित्र काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अपलोड झाले होते. ते झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी ही रुग्णवाहिका राष्ट्रवादी काँग्रेसची असून ती जिथे दिसेल, तेथे जाळून टाकण्याचा इशारा दिला. यावरून, राष्ट्रवादी आणि मनसे आमनेसामने आल्या असून, या रुग्णवाहिकेवरून राजकारण सुरू झाले आहे. गुजरात पोलिसांच्या चकमकीत १५ जून २००४ रोजी ठार झालेल्या इशरत जहाँच्या नावे मुंब्य्रात, माय मुंब्रा फाउंडेशन या संस्थेने चार वर्षांपूर्वी ‘शहीद इशरत जहाँ’ नावाने रुग्णवाहिका सुरू केली. परंतु, आता डेव्हिड हेडलीच्या इशरत ही मानवी बॉम्ब असल्याच्या साक्षीनंतर संबंधित रुग्णवाहिकेचे छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड केले आहे. त्यावर, मनसेने आक्षेप घेऊन थेट राष्ट्रवादीला निशाणा करून ती रुग्णवाहिका जिथे दिसेल, तेथे जाळून टाकण्याचा इशारा दिला. रुग्णवाहिका देण्याची इच्छा असेलेल्यांनी शहीद हनुमंताप्पा यांच्या नावाने द्यावी. तसेच समाजासाठी मनसे दोन रुग्णवाहिका देणार असून, रविवारी ठाण्यात अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा लोकार्पण सोहळा पार पडेल, असे जाधव यांनी सांगितले.- अविनाश जाधवने माझे नाव घेतल्याने त्याला चमकण्याची संधी मिळाली. पण, नाव घेण्यापूर्वी ती रुग्णवाहिका कोणी सुरू केली, याचा तपास त्याने घ्यावा, असा सल्ला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनसेला दिला आहे.इशरतबाबतचा खटला न्यायालयात सुरू असून, न्यायालयाचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत रुग्णवाहिकेवरील तिचे नाव कायम ठेवण्यात येईल, अशी माहिती रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी पुढाकार घेणारे माय मुंब्रा फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी नगरसेवक रौफ लाला यांनी दिली.
इशरत जहाँ रु ग्णवाहिकेवरून नेत्यांत तू तू-मैं मैं
By admin | Updated: February 14, 2016 00:34 IST