शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पात आहे का? केंद्रीय मंत्र्यांचा सवाल, आयुक्तांना सुनावले खडे बोल..

By मुरलीधर भवार | Updated: September 12, 2022 20:05 IST

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना बसला रस्त्यावरील खड्यांचा फटका.

कल्याणकल्याणडोंबिवली शहरातील रस्ते इतके खराब आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. हे शहर स्मार्ट सिटी प्रकल्पांत आहे का असा सवाल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उपस्थित करीत महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना खडे बोल सुनावणीत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांचा फटका केंद्रीय मंत्री ठाकूर यांनाही बसला आहे. तसेच शहर अस्वच्छतेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत जोरदार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहे. हे खड्डे गणपती उत्सवापूर्वी बुजविले जातील असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले होते. गणपती उत्सव पार पडली तरी रस्त्यावरील अनेक ठिकाणचे खड्डे बुजविले गेले नाहीत. केंद्रीय मंत्री ठाकूर हे तीन दिवसाच्या कल्याण डोंबिवली दौ:यावर आहे. ते पक्षाच्या बैठका घेत आहे. तसेच व्यापारी वर्ग आणि प्रशासनाच्या अधिका:यांच्या भेटी गाठी घेत आहे.

आज सायंकाळी मंत्री ठाकूर यांनी महापालिका मुख्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंट्रोल रुमला भेट दिली. यावेळी आयुक्त दांगडे यांच्यासह मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, किसन कथोरे, संजय केळकर आदी उपस्थित होते. यावेळी स्मार्ट सिटी प्रकल्पांसंदर्भात एक चित्रफित मंत्री ठाकूर यांना दाखविली जात होती. त्यांच्या शेजारीच आयुक्त बसले होते. यावेळी ठाकूर यांनी हे शहर स्मार्ट सिटी प्रकल्पांत आहे. खड्डय़ामुळे रस्त्यांची स्थिती खूप खराब आहे. अन्य शहरातही स्मार्ट सिटी प्रकल्प राबविले जात आहे. त्या शहरात रस्ते चांगले झालेत. हॉटी कल्चर चा प्रयोग करुन शहर सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. तसेच शहरात स्वच्छता राखली जात आहे. याकडे ठाकूर यांनी लक्ष वेधले.

केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यावर देशातील १०० शहरे स्मार्ट सिटी करण्यासाठी निवडली गेली. त्यापैकी कल्याण डोंबिवली शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश केला गेला. एक हजार कोटीचे प्रकल्प या शहरात राबविले जात आहे. मात्र स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाविषयी खुद्द केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केल्याने या प्रकल्पाच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरkalyanकल्याणdombivaliडोंबिवली