शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

टीव्ही लावण्याच्या कारणावरुन पतीने केला पत्नीवर लोखंडी सळईने प्रहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:46 IST

भल्या पहाटे टीव्ही पाहणा-या पतीला टीव्ही बंद करण्याचा सल्ला दिल्याने त्याला तो रुचला नाही. यातून संतप्त होऊन त्याने तिला शिवीगाळ केली. याला विरोध केल्याने पत्नीवर लोखंडी सळईनेच प्रहार करणा-या प्रमोद बॅनर्जी या पतीविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देकळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलमुलाने केली मध्यस्थी केल्याने आईची झाली सुटकाशिवीगाळ करणाऱ्या पतीला रोखल्याने केला हल्ला

ठाणे: टीव्ही लावण्याच्या कारणावरुन पतीने पत्नीवर लोखंडी सळईने प्रहार केल्याची घटना कळवा परिसरात घडली. याप्रकरणी पती प्रमोद (४०) याच्याविरुद्ध त्याची पत्नी बसंती बॅनर्जी (३८, रा. कळवा) हिने कळवा पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.किरकोळ कारणावरुन पती नेहमीच भांडण करीत असल्यामुळे बसंती ही मुलासह दिवा येथे अलिकडेच वास्तव्याला गेली होती. परंतू, यापुढे भांडण करणार नाही, असा दावा करीत १० जुलै रोजी त्याने तिला पुन्हा कळवा येथील घरी आणले. १४ जुलै २०१९ रोजी पहाटे २.३० वा. च्या सुमारास तो टीव्ही पहात होता. तर प्रकृती ठीक नसल्याने ती झोपलेली होती. त्यामुळे तिने पतीला टीव्ही बंद करण्यास सांगितले. त्यावर संतापलेल्या तिच्या पतीने तिला शिवीगाळ केली. तिने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने घरातील लोखंडी पाईपने तिच्या डोक्यात प्रहार केला. यात ती रक्तबंभाळ झाली असता, मुलगा कालीचरण याने तिची सुटका केली. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर तिने या प्रकरणी पती प्रमोद बॅनर्जीविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे