शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे जमील शेख खून प्रकरणातील इरफानची पोलीस कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 23:10 IST

महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणी उत्तरप्रदेशातील लखनौ शहरातून अटक केलेल्या इरफान शेख (२१) याला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्दे यूपीच्या एसटीएफच्या मदतीने ठाणे पोलिसांनी केली होती अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणी उत्तरप्रदेशातील लखनौ शहरातून अटक केलेल्या इरफान शेख (२१) याला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. इरफानला न्यायालयात आणले जाणार असल्यामुळे राबोडीतील एका गटाने गर्दी केली होती.उत्तरप्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शनिवारी दुपारी यूपीतील लखनौ भागातून ताब्यात घेतले आहे. त्याला सोमवारी (५ एप्रिल) पहाटेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने ठाण्यात आणले. त्यानंतर त्याला रितसर अटक करण्यात आली. अटकेनंतर सोमवारी दुपारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. इरफान याला दोन लाख रुपयांची सुपारी ओसामा शेख याने दिल्याची माहिती चौकशीत समोर आल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने न्यायालयात दिली. जमील शेख यांची २३ नोव्हेंबर २०२० रोजी दिवसाढवळया ठाण्यातील राबोडीमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी जमील हे त्यांच्या दुचाकीवरुन जात असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या इरफान याने त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी शाहीद शेख (२५, रा. राबोडी, ठाणे) हा इरफान सोबत होता. तोच मोटारसायकलही चालवित होता. त्याला या हत्याकांडानंतर २५ नोव्हेंबर २०२० रोजी अटक केली होती. यातील मुख्य सूत्रधार नेमकी कोण आहे? ओसामाची नेमकी भूमीका काय? त्याचबरोबर त्याचाही शोध घेणे बाकी आहे. त्याच्या अटकेनंतर अनेक बाबींचा उलगडा होईल, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.* इरफान हा मुळचा उत्तरप्रदेशातील गोरखपूरचा रहिवाशी असून तो त्याठिकाणी शेतमजूरी करतो. तर ओसामा शेख हा राबोडीतील रहिवाशी असून तोही मुळचा गोरखपूरचा रहिवाशी आहे. तो कधी राबोडी तर कधी गोरखपूर असा वास्तव्यास असतो.* राबोडीत मात्र तणावइरफान याच्या अटकेपासून राबोडीत मात्र तणावाचे वातावरण आहे. दरम्यानच्याच काळात राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या कार्यालयावर शनिवारी एका संतप्त जमावाने हल्ला केला होता. तर नजीब यांचे छायाचित्र असलेल्या एका रुग्णवाहिकेचीही या जमावाने तोडफोड केली होती. गेल्या तीन दिवसांपासून नजीब यांचे कार्यालय तसेच जमील शेख यांचे निवासस्थान असलेल्या भागात राबोडी पोलिसांसह राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात केली आहे. सोमवारीही इरफान याला ठाणे न्यायालयात आणले जाणार असल्यामुळे त्याठिकाणी एका गटाने मोठी गर्दी केली होती. मात्र मोठा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नजीब हे मात्र आजारी असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक