शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांची एक कोटींची फसवणूक, ५९७ गुंतवणूकदारांना घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 00:08 IST

पातलीपाडा येथील त्रिमूर्तीरत्न ज्वेलर्सचा मालक शेलार याने सोनेखरेदी करणाऱ्यांना विविध योजनांच्या नावाखाली आकृष्ट केले होते.

ठाणे : सुवर्णयोजनेमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या संतोष शेलार (५१) या ज्वेलर्समालकाला ठाणे न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या योजनेतून ५९७ जणांची एक कोटी ११ लाखांची फसवणूक झाल्याचे नौपाडा पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले आहे.पातलीपाडा येथील त्रिमूर्तीरत्न ज्वेलर्सचा मालक शेलार याने सोनेखरेदी करणाऱ्यांना विविध योजनांच्या नावाखाली आकृष्ट केले होते. त्याच्या योजनेनुसार १५ महिन्यांमध्ये १५ हजार रुपये तसेच व्याजाचे तीन हजार असे प्रत्येकी १८ हजार रुपये किंवा त्याच भावातील सोन्याची वस्तू देण्याचे ठरले होते. त्यानुसार, त्याने काही गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे परतावा दिला. काहींना पैसे आणि सोनेही मिळवून दिले. फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०१९ या काळात राबवलेल्या या योजनेमध्ये रामचंद्रनगर, वैतीवाडीतील प्रिया जाधव आणि त्यांचा मुलगा यांच्याकडून प्रतिमहिना एक हजार रुपये असे १५ महिने ३० हजार रुपये घेतले. त्यांना मुदतपूर्तीनंतर देय असलेली ३६ हजारांची रक्कम त्याने दिलीच नाही. अशा प्रकारे सुमारे १५० गुंतवणूकदारांकडून चार लाख १७ हजार ५०० रुपये त्याने उकळले. याप्रकरणी २७ जून २०१७ रोजी फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर आणि संजय धुमाळ यांच्या पथकाने शेलारला काही तासांमध्ये अटक केली.चौकशीमध्ये या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे उघड झाले आहे. पाच दिवसांमध्ये ५९७ गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यांच्याकडून एक कोटी ११ लाखांची रक्कम शेलारने उकळल्याचे उघड झाले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये त्याने सुमारे ६०० जणांची अशा प्रकारे एक कोटी ११ लाखांची फसवणूक केल्याचे आतापर्यंतच्या तपासामध्ये उघड झाले आहे. यात आणखीही आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या गुंतवणूकदारांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, त्यांनी नौपाडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सोंडकर यांनी केले आहे.दलालांना एक ते तीन टक्क्यांची ‘बक्षिसी’कळवा, रामचंद्रनगर, नौपाडा, पाचपाखाडी आदी ठाणे परिसरातील गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते. काहींना त्याने दलाल म्हणून नियुक्ती करून त्यांना एक ते तीन टक्केदलाली तो ‘बक्षिसी’ म्हणून देत होता. अशा सुमारे ४०० दलालांनी त्यांचे मित्र, नातेवाइकांना या सुवर्णभिशीच्या भरीस पाडले. दलालांना या साखळीतून पैशांचा परतावा मिळण्यासाठी त्याने एका संगणकीय सॉफ्टवेअरचाही उपयोग केला होता. चार पगारी कर्मचारीही त्याने आपल्या दुकानात या योजनेसाठी नेमले होते.

टॅग्स :fraudधोकेबाजी