शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘टॉयलेट घोटाळ्याची एसीबीमार्फत चौकशी’, माहिती अधिकाराला दाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 03:33 IST

ठाणे : दिव्यातील प्रभाग क्रमांक ६५ मध्ये शौचालय न बांधताच त्याचे बिल ठेकेदाराला अदा केल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे : दिव्यातील प्रभाग क्रमांक ६५ मध्ये शौचालय न बांधताच त्याचे बिल ठेकेदाराला अदा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसीबीमार्फत चौकशी करण्याची मागणी आ. संजय केळकर यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरदेखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.एकीकडे ठाणे महापालिका स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विविध स्वरुपाचे टॉयलेट उभारत आहे. परंतु, दुसरीकडे मात्र टॉयलेट न बांधतांच त्याचे बिल लाटण्याचा प्रकार दिव्याच्या निमित्ताने पुढे आला आहे. २०१४ मध्ये ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत येणाºया जुन्या प्रभाग क्र. ६५ ( नवीन प्रभाग क्रं. २७, २८, २९) मध्ये नवीन शौचालय बांधणीसाठी १ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर केला होता. निविदा आणि अन्य कायदेशीर प्रक्रि या पार पडल्यानंतर मे. एल.के. देवळे या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. कंत्राटदराने काम सुरू केले. शौचालय बांधून झाले म्हणून महापालिकेने त्याला बिलाची रक्कम सुद्धा अदा केली. परंतु, वास्तविक येथे एकही शौचालय बांधले नसल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. साडेचार लाख लोकसंख्येच्या तुलनेत दिव्यात मूलभूत सोयीसुविधा तुटपुंज्या आहेत.या शौचालय घोटाळ्याची लेखी तक्रार करून चौकशीची मागणी भाजप दिवा शीळ विभाग अध्यक्ष अ‍ॅड. आदेश भगत यांनी आयुक्त व आ. संजय केळकर यांचे कडे केली आहे. वास्तविक दिव्यातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त असताना शौचालयाच्या कामात इतका मोठा भ्रष्टाचार झाला असल्याने सर्व संबंधित भ्रष्ट अधिकारी, कंत्राटदार व तत्कालीन नगरसेवक यांची एसीबी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केळकर यांनी पोलीस उपायुक्त, लाच लुचपत विभाग, ठाणे यांच्याकडे केली आहे.स्टेशनपासून २ ते ३ किलोमीटर अंतरावर महापालिकेचे एकही सार्वजनिक शौचालय नाही. नवीन शौचालय बांधणीसाठी मंजूर सुमारे १ कोटी १९ लाखाचा निधी कंत्राटदार, अधिकारी व तत्कालीन नगरसेवक यांनी परस्पर लाटल्याची लेखी माहिती अधिकारान्वये देखील देत नाहीत.