शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ब्रह्माण्ड कट्ट्यावर ओळख पुर्वांचलची ईशान्य भारताचे अंतरंग कार्यक्रम संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 16:35 IST

ब्रह्माण्ड कट्ट्यावर या रविवारी जयवंत कोंडविलकर यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून ईशान्य भारताचे अंतरंग उलगडवून दाखविण्यात आले.

ठळक मुद्देब्रह्माण्ड कट्ट्यावर ओळख पुर्वांचलची ईशान्य भारताचे अंतरंगकार्यक्रमाची सुरूवात छायाचित्र आणि पुर्वांचल भागाची माहिती सांगून जयवंत कोंडविलकर यांची मुलाखत

ठाणे : ब्रम्हांड कट्टा आयोजित "ओळख पुर्वांचलची ईशान्य भारताचे अंतरंग" हा मुलाखतीचा व महीलांसाठी हळदी कुंकुचा कार्यक्रम रविवारी सांज स्नेह सभागृहात झाला. कट्टयाच्या सुरुवातीला स्थानिक कलाकारांनी आपली कला सादर करुन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिप प्रज्वलन व भारत मातेला पुष्प अर्पित करत सावन कुमार सुपे यांनी देश भक्तीपर गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.        

       पुर्वांचलमधे गेल्या ४० पेक्षा जास्त वर्षांपासून अविरत काम करत असलेल्या - पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाहक जयवंत कोंडविलकर यांची मुलाखत घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात छायाचित्र आणि पुर्वांचल भागाची माहिती सांगून झाली. तिथला भौगोलिक भाग, संस्कृती, राहणीमान, आतंकवादी कारवायांपासून होणार त्रास, शासनाकडून इतकी वर्षे दुर्लक्षित राहिल्यामुळे उभे राहिलेले प्रश्र आणि ह्याच परिस्थितीतून वाढणारी घुसखोरी … अशा अनेक विषयांवर माहितीपर प्रकाश टाकला.मुलाखतीत अत्रे कट्टयाच्या संपदा वागळे यांनी त्यांचा कोकणातल्या रत्नागिरी जिल्हा ते पुर्वांचल प्रवास, लहानपणीचे पुर्वांचल मधले अनुभव, गुरूवर्य भैय्याजी काणे यांचे सुरूवातीचे दिवस, नंतर वृद्धींगत होणारं कार्य, अशा विविध पैलूंवर प्रश्र विचारून माहिती घेतली. "घरात देवाचं स्थान ईशान्येकडे असतं हे माहिती असताना, भारताच्या ईशान्येत वसलेल्या देवाकडे आपण कित्येक वर्ष दुर्लक्ष करतोय," ही तळमळ जयवंत यांनी व्यक्त केली. प्रत्येक भारतीयांने उठून पुर्वांचलात जावं ही अपेक्षा नाहीये तर त्यांना प्रत्येकाने आपलंसं करावं, त्यांच्या शिक्षणात आणि विकासात शक्य तितकी मदत करावी, ही अपेक्षा असल्याचं सांगितलं. प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुर्वांचलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करू शकतो हे सांगितलं. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम हे वैशाली भागवत हीने गीत गाऊन झाली. यावेळी ब्रह्मांड कट्टयाच्यावतीने प्रगती जाधव व स्नेहल जोशी यांनी हळदी कुंकू सोहळा आयोजित करुन महीलांना वाण व तिळगुळ दिले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई