शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील १२ जणांनी दिल्या मुलाखती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 00:09 IST

विधानसभा निवडणुकीची तयारी : कल्याण-डोंबिवलीतील मतदारसंघांचा घेतला आढावा

कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ काँग्रेसचीही लगबग सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवली जिल्ह्यासह आसपासच्या शहरांतील विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडल्या. कल्याण-डोंबिवली जिल्ह्यात चार मतदारसंघ असून यापैकी तीन मतदारसंघांतील १२ जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून कोणीही इच्छुक नाहीत.

राज्याची विधानसभा निवडणूक आॅक्टोबरमध्ये होत आहे. सप्टेंबरच्या दुसºया किंवा तिसºया आठवड्यात निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी आतापासूनच प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने कामाला लागले आहेत. ठाणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीने नुकत्याच ठाणे येथे घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही सोमवारी कल्याण-मुरबाड रोडवरील एका सभागृहात कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड, भिवंडी पूर्व-पश्चिम येथील विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जिल्हा प्रभारी कॅप्टन निलेश पेंढारी, मधू चव्हाण, चंद्रकांत हंडोरे आणि जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधितांच्या मुलाखती घेण्यात आल्या.कल्याण पश्चिम विधानसभेसाठी पाच जण इच्छुक असून यामध्ये महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, प्रिया ताजणे, बबन ढमाले, कपिल सूर्यवंशी आणि प्रकाश मुथा यांचा समावेश आहे.तर, कल्याण पूर्व मतदारसंघासाठी पॉली जेकब, शैलेश तिवारी, नवीन सिंग तर डोंबिवलीसाठी राधिका गुप्ते, जो.जो. थॉमस, दिलीप गायकवाड आणि नगरसेवक नंदू म्हात्रे इच्छुक आहेत. दरम्यान, काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष आणि कल्याणमधील रहिवासी सुरेंद्र आढाव यांनी अंबरनाथ मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांचीही मुलाखत घेण्यात आली.कल्याण ग्रामीण मतदारसंघ मित्रपक्षालाकल्याण पश्चिम-पूर्व आणि डोंबिवली या तीनही मतदारसंघांतून इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे सोमवारी दिसून आले. परंतु, कल्याण ग्रामीणमधून एकही इच्छुक नसल्याने हा मतदारसंघ मित्रपक्ष राष्ट्रवादीसाठी सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. त्याला मधू चव्हाण यांनीहीदुजोरा दिला.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे