शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोवर-रुबेला लसीकरणावर आंतरराष्ट्रीय निरीक्षकांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:51 IST

जिल्ह्यातील सुमारे २६ लाख ८५ हजार १५ बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील सुमारे २६ लाख ८५ हजार १५ बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार, लसीकरण सुरळीत होत आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी अटलांटा यूएस येथील आंतरराष्टÑीय निरीक्षक डॉ. कोलीन या ठाण्यात दाखल झाल्या आहेत. त्यांनी ठाणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास भेट देऊन या मोहिमेची पाहणी केलीजिल्हाभरातील मुलामुलींना गोवर-रुबेला लसीकरण करण्याची मोहीम जागतिक आरोग्य संघटनेद्वारे हाती घेण्यात आली आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये ही मोहीम आधीच पार पडली. आता उत्तर प्रदेश आणि महाराष्टÑात ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेवर आंतरराष्टÑीय निरीक्षकांनी लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी अटलांटा यूएस येथील ‘एनडीसी’ या आरोग्य संघटनेच्या डॉ. कोलीन यांनी या मोहिमेच्या पाहणीस प्रारंभ केला. त्यांच्याद्वारे जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि शासनाच्या नियंत्रणातील रुग्णालयांमधील लसीकरणाच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. संबंधित आरोग्य यंत्रणांकडून लसीकरणाचे काम गांभीर्याने होत आहे की नाही, याकडे त्या कटाक्षाने लक्ष देत असून वेळोवेळी कामाचा आढावा घेत आहेत.ठाणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व सिव्हील रुग्णालयास भेट देऊन कामाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेघे यांनी डॉ. कोलीन यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी जिल्हाभरातील वैद्यकीय अधिकाºयांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांच्या नियंत्रणात ठाण्यासह रायगड, पालघर या तीन जिल्ह्यांत लसीकरणाचे काम सुरू आहे.>१६ टक्के लसीकरणजिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ४२ हजार ३६८ म्हणजे १६ टक्के मुलांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. ज्या भागात लसीकरणास प्रतिसाद कमी आहे, तिथे वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रेघे यांनी सांगितले.