शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ज्वेलर्सचे दुकान लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा ७२ तासांत पर्दाफाश

By जितेंद्र कालेकर | Updated: December 24, 2024 21:28 IST

खंडणीविराेधी पथकासह मध्यवर्ती शाेधपथकाची संयुक्त कारवाई : २९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यातील नौपाडा भागातील वामन शंकर मराठे ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दागिन्यांच्या दुकानातून २८ लाख ७७ हजारांचे दागिने लुटणाऱ्या लीलाराम ऊर्फ लीलेश मेघवाल (२९, रा. सुरत, मूळ रा. जालोर, राजस्थान) याच्यासह पाचजणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी मंगळवारी दिली. हे सराईत चोरटे असून त्यांच्याकडून ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, साडेपाच किलो वजनाची चांदीची नाणी, भांडी, दागिने, इमिटेशन ज्वेलरी आणि मोबाईल फोन असा २९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

१७ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे १:५० ते ४:३० वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडीकोयंडा तोडून चाेरट्यांनी आत शिरकाव करून २८ लाख ७७ हजार ४९० रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले हाेते. नौपाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समांतर तपासासाठी पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविले होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी खंडणीविरोधी पथक, मध्यवर्ती गुन्हे शाेध, युनिट एक आणि नौपाडा पोलिस यांची चार वेगवेगळी पथके तयार केली.

सहायक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे निरीक्षक नरेंद्र पवार, सहायक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे, श्रीकृष्ण गोरे, भूषण कापडणीस, उपनिरीक्षक विजयकुमार राठोड आणि मध्यवर्ती शोधपथकाचे निरीक्षक संजय शिंदे, आदींच्या पथकाने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्वक तपास करून लीलाराम तसेच चुन्नीलाल ऊर्फ सुमत प्रजापती (३५, रा. नाडीयावाड, सुरत, मूळ रा. राजस्थान), जैसाराम ऊर्फ जेडी कलब ( ३२, मुंबई, मूळ रा. राजस्थान), दोनाराम ऊर्फ दिलीप पराडिया, (२४, रा. सुरत, गुजरात, मूळ रा. पहाडपुरा, राजस्थान ) आणि नागजीराम मेघवाल (२९, रा. नाडीयावाड, मूळ रा. राजस्थान) या पाचजणांच्या टोळीला २१ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीतील सर्व दागिन्यांसह मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना ठाणे न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत पाेलिस काेठडी दिली. आरोपींवर सुरतमध्येही चोरीचे दोन गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. अशी आहे एमओबीदुकानात चोरी करण्यापूर्वी आधी रेकी करून बाजूच्या दुकानात गाळा भाड्याने घेऊन दुकानाला भगदाड पाडले. चोरी करण्याची या टोळीची एमओबी आहे. नौपाड्यात त्यांनी आधी काही दिवसांपूर्वी टेहळणी केल्याचे उघड झाले. अशी केली अटक-सीसीटीव्हीमध्ये दोघांचे फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्याच आधारे दुकान ते ठाणे रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशन ते थेट गुजरातमधील १० ते १२ रेल्वे स्थानकातील फुटेजची तपासणी केली. याच पडताळणीमध्ये हा गुन्हा उघड झाला.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी