शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

डोंबिवलीत ब्राह्मण ज्ञातींचे एकत्रिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 11:33 IST

जातीपातीचे राजकारण योग्य नाहीच, त्यातही द्वेषाने वागणून देणे अथवा अपमानास्पद बोलणे कधीही उचित नाही. त्यामुळे यापुढे अन्याय खपवून घेतला जाणार नाही. अन्याय कोणावरही करायचा नाही आणि करवूनही घ्यायचा नाही. डोंबिवलीत संपन्न झालेल्या ब्राह्मण महासंघाच्या बैठकीत एकमताने हे ठरवण्यात आले.

ठळक मुद्देअन्याय खपवून घेतला जाणार नाही :ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षपदी प्रज्ञेश प्रभूघाटे यांची निवड

डोंबिवली: जातीपातीचे राजकारण योग्य नाहीच, त्यातही द्वेषाने वागणून देणे अथवा अपमानास्पद बोलणे कधीही उचित नाही. त्यामुळे यापुढे अन्याय खपवून घेतला जाणार नाही. अन्याय कोणावरही करायचा नाही आणि करवूनही घ्यायचा नाही. डोंबिवलीत संपन्न झालेल्या ब्राह्मण महासंघाच्या बैठकीत एकमताने हे ठरवण्यात आले. ब्राह्मणांनीही एकत्र येण्याची नितांत गरज असून त्यासाठी डोंबिवलीसह परिसरातील ब्राह्मणांनी एकत्र यावे, संघटीत व्हावे असे आवाहन ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले.येथिल ब्राह्मण सभेमध्ये मंगळवारी रात्री घेण्यात आलेल्या सभेमध्ये संघटनात्मक कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रज्ञेश प्रभुघाटे यांची महासंघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. तर संदीप पुराणिक हे महासंघाचे कार्यवाह म्हणुन काम बघतील मानस पिंगळे, प्रदीप जोशी हे उपाध्यक्ष, निलेश विरकर सहकार्यवाह, विवेक परांजपे कोषपाल, मनिषा धोपटकर सहकोषपाल, तर डॉ. अरुण नाटेकर, माधव घुले, प्रशांत जोशी, नारायण रत्नपारखी, हेमंत पाठक, मुकुंद कुलकर्णी, डॉ.विनय भोळे हे सल्लागार पदी नियुक्त करण्यात आले. तसेच वासुदेव रायकर, अनघा बोंद्रे, उन्मेश शेवडे, अनुजा कुलकर्णी, अनिकेत घमंडी, वैशाली कोरडे, प्रदीप म्हसकर, प्रसाद शुक्ल, अभिजित कानेटकर हे सदस्यपदी नियुक्त करण्यात आले. नव्या कार्यकारणीच्या पहिल्या बैठकीत महिला समिती, शिक्षण समिती, सांस्कृतिक समिती, जनसंपर्क आणि प्रसिद्धी समिती, युवा समिती अशा समिती नेमण्यात आल्या असून आगामी बैठकीत त्या समितीमध्ये कार्यरत असणा-या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे प्रभुघाटे यांनी सांगितले. पण ब्राह्मणांनी एकत्र येणे ही काळाची गरज असून संघटीतपणे कार्यरत असणे आवश्यक आहे, त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने ज्ञातींसह महासंघाचे सभासद व्हा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :brahman mahasanghब्राह्मण महासंघdombivaliडोंबिवलीDevendra Fadnvisदेवेंद्र फडणवीस