शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

हक्काची निवड श्रेणी देण्याऐवजी ८२ वर्षीय वृद्ध शिक्षक पत्नीची मीरा भाईंदर महापालिकेकडून फरफट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 20:52 IST

ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेत त्याकाळी शिक्षक म्हणून नागनाथ दामोदरे हे शिकवत असत. 

मीरारोड -  मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत निवृत्त झालेल्या शिक्षकास त्याच्या मृत्यू नंतर ८ वर्ष उलटली तरी मीरा भाईंदर महापालिके कडून हक्काची निवडश्रेणी दिली गेली नाही . त्या शिक्षकाच्या मृत्यू नंतर ८२ वर्षांच्या वृद्ध शिक्षक पत्नी गेल्या ८ वर्षां पासून वारसा हक्का नुसार निवडश्रेणी मिळावी म्हणून महापालिकेचे उंबरठे व्हीलचेअर वरून झिजवत आहेत . 

ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेत त्याकाळी शिक्षक म्हणून नागनाथ दामोदरे हे शिकवत असत. नंतर जिल्हापरिषदेच्या शाळा ह्या त्यावेळच्या मीरा भाईंदर नगर परिषदे कडे वर्ग झाल्याने दामोदरे यांची सेवा सुद्धा पालिकेत वर्ग झाली. मुख्याध्यापक पदावरून ते १ एप्रिल १९९४ रोजी सेवानिवृत्त झाले . एक महिना सहा दिवस पालिकेचे कर्मचारी म्हणून काम केले.  १ जानेवारी १९८६ पासून एकूण सेवा २९  वर्षे आठ महिने इतकी झाली असल्याने निवडश्रेणीचा लाभ त्यांना मिळायला हवा होता.  

सप्टेंबर २०१२ मध्ये दामोदरे यांचा मृत्यू झाला . त्यांच्या पत्नी शांता ह्यांनी कौटुंबिक वेतनासह निवडःश्रेणी मिळावी म्हणून २०१२ साली महापालिकेच्या शिक्षण विभागात अर्ज केला होता . त्यांचे कौटुंबिक निवृत्ती वेतन देण्यास सुद्धा विलंब केला आणि जे दिले ते देखील कमी रकमेचे दिले गेले. 

गेल्या ८ वर्षां पासून शांता ह्या त्यांचा नातू सागर ह्याच्या आधारे हक्काची निवड श्रेणी आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनातील कमी दिलेली रक्कम मिळावी म्हणून महापालिकेसह शिक्षण विभागा कडे पत्र व्यवहार करत आहेत . परंतु आज वयाच्या ८२ व्या वर्षी देखील ह्या शिक्षक पत्नीस अजूनही पतीच्या हक्काचा मोबदला पालिकेने दिलेला नाही . 

चालत येत नाही तरी त्या उल्हासनगर वरून येतात . व्हीलचेअरवरून त्या महापालिकेचे उंबरठे झिजवत आहेत . परंतु अनु निवृत्त शिक्षकां प्रमाणेच पालिकेच्या शिक्षण विभागाने निवडश्रेणीचा लाभ देण्यास गंभीर अशी कसूर चालवली आहे . माहिती अधिकारात देखील त्यांना पालिके कडून आजही निवडश्रेणीची कार्यवाही प्रस्तावित आहे असे निगरगट्ट ठोकळेबाज उत्तर शिक्षण अधिकाऱ्या कडून दिले जात आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर