शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रिक्षात तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:41 IST

धावत्या रिक्षामध्ये सहप्रवासी म्हणून बसलेल्या बँक कर्मचारी तरुणीचा विनयभंग करणाºया विलास विशे (२९, रा. शहापूर, जिल्हा ठाणे) याला बुधवारी चितळसर पोलिसांनी अटक केली आहे

ठाणे : धावत्या रिक्षामध्ये सहप्रवासी म्हणून बसलेल्या बँक कर्मचारी तरुणीचा विनयभंग करणाºया विलास विशे (२९, रा. शहापूर, जिल्हा ठाणे) याला बुधवारी चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.हे दोघेही ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानक येथून शेअर रिक्षामध्ये बसले होते. तो वसंतविहार येथील पोस्ट कार्यालयात, तर ती त्याच परिसरातील एका बँकेत नोकरीला आहे. रिक्षा माजिवडा येथून वळसा घेऊन वसंतविहारकडे जात असताना त्याने तिचा विनयभंग केला, अशी तिची तक्रार आहे. तिने आरडाओरडा केल्यानंतर वसंतविहार येथे आल्यावर काही नागरिकांनी पकडून त्याला चितळसर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तत्काळ अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.दरम्यान, आपल्याकडून हा प्रकार अनवधानाने झाल्याचा दावा या पोस्ट कर्मचाºयाने केला. तसेच हा कर्मचारी चांगल्या वर्तनाचा असल्याचा दावाही काही महिलांनी करून त्याला सोडण्याची मागणी पोलिसांकडे केली. मात्र, हा अधिकार न्यायालयाचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलीस उपनिरीक्षक रूपाली पाटील याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.