शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पडघा उपकेंद्राची केंद्रीय सुरक्षा दलाकडून पाहणी; मुंबईसह पाच जिल्ह्यांना वीजपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 13:57 IST

नेमकी पाहणी कशासाठी, माहित नसली तरी बोरिवली घटनेच्या पार्श्वभूमीवर झाली असावी, असा अंदाज

मेघनाथ विशे, लोकमत न्यूज नेटवर्क, पडघा: बोरिवली गावातून काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे विद्युत उपकेंद्र पडघा याच परिसरात आहे. अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर झालेल्या या उपकेंद्राची नुकतीच दिल्लीतील राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दलामार्फत पाहणी करण्यात आली. नेमकी ही पाहणी कशासाठी झाली, हे स्पष्ट झाले नसले तरी बोरिवली घटनेच्या पार्श्वभूमीवर झाली असावी, असा अंदाज आहे.

या उपकेंद्रासाठी पडघा, वांद्रे, जुहूपाडा, भादाणे या गावांतील जमिनी संपादित केल्या आहेत. याच उपकेंद्रातून संपूर्ण ठाणे जिल्हा, गुजरातचा काही भाग, नंदुरबार, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, पालघर, रायगड, मुंबई, नवी मुंबई येथे वीजपुरवठा केला जातो. चंद्रपूर केंद्रात वीजनिर्मिती करून ती वाहिन्यांद्वारे पडघा उपकेंद्रात आणली जाते. येथे तिचे रूपांतर करून तिचा पुरवठा केला जातो. केवळ पडघाच नव्हे, तर कळवा, खारघर, लोणीकंद येथील छोट्या उपकेंद्रांचीही सुरक्षा दलाने पाहणी केली. सध्या येथे ठाणे ग्रामीण पोलिसांंबरोबरच भांडूप सुरक्षारक्षक मंडळाचे ५८ जवान तैनात आहेत. यातील बहुतांश सुरक्षारक्षक  प्रकल्पग्रस्त, तसेच स्थानिक आहेत.

स्थानिक सुरक्षारक्षकांमध्ये अस्वस्थता

या केंद्रात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करणार असल्याच्या चर्चेमुळे स्थानिक, तसेच प्रकल्पग्रस्त सुरक्षारक्षक हवालदिल झाले आहेत. यामुळेच सुरक्षारक्षकांच्या शिष्टमंडळाने या संदर्भात अधीक्षक अभियंता राम कोल्हे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.

पडघा विद्युत उपकेंद्र हे अतिसंवेदनशील असल्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अतिरिक्त बळाला आमचा विरोध नाही. मात्र, यामुळे आमच्या नोकऱ्या धोक्यात येऊ नयेत, अशीच आमची मागणी आहे.-बिरबल विशे, सुरक्षा पर्यवेक्षक

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून पडघा उपकेंद्राची पाहणी करण्यात आली. त्यांनी हे अतिसंवेदनशील क्षेत्र असल्याने याची सुरक्षाव्यवस्था केंद्रीय दलाकडे असावी, असा अहवाल दिला आहे. मात्र, येथे वीस ते पंचवीस वर्षे सेवा करणाऱ्या सुरक्षारक्षकांवर अन्याय न होता त्यांनी हे काम करावे.- अनिल बाबर, सहायक सुरक्षा अधिकारी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून राज्यातील चार प्रमुख उपकेंद्रांची पाहणी करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा अन्य दलाकडे देण्यात यावी, या संदर्भात कोणत्याही प्रकारचा लेखी अहवाल सादर झालेला नाही.- राम कोल्हे, अधीक्षक अभियंता

 

टॅग्स :thaneठाणे