शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक दबाव आणून वाममार्गाला लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 04:30 IST

पोलिसांमुळे सुटका : पीडित मुलीचे कथन

ठाणे : मानसिक दबाव आणून त्यांना वाममार्गाला लावणाऱ्या महिलांची प्रवृत्ती दोन दुर्दैवी मुलींच्या जबाबातून उघडकीस आली आहे. ठाणे पोलिसांनी एका कारवाईमध्ये या मुलींची आठ दिवसांपूर्वी सुटका केली.अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कळवा येथील मनीषनगरातील एका सोसायटीमध्ये १५ मे रोजी धाड टाकली. यावेळी गोरगरीब मुलींना अनैतिक कामासाठी वापरणाºया तिघींना अटक करण्यात आली. त्यांच्या तावडीतून दोन अल्पवयीन मुलींसह चार पीडित मुलींची सुटकाही पोलिसांनी केली. त्यापैकी दोन मुलींनी त्यांची आपबिती पोलिसांसमोर कथन केली.दीपाली आणि कविता (नावे बदलली आहेत) या सहा महिन्यांपूर्वी सायन येथे घरकामासाठी जायच्या. एक दिवस घराजवळच्या बसथांब्यावर दीपालीची ओळख ममता नामक महिलेशी झाली. त्यांनी एकमेकांचे मोबाइल नंबरही यावेळी घेतले. चार महिन्यांपूर्वी दीपाली आणि कविताचे घरकाम बंद झाले. १५ दिवसांपूर्वी दीपालीला ममताचा फोन आला. चांगल्या पगाराचे आमिष दाखवून तिने कळवा येथील एका सोसायटीमध्ये मैत्रिणीला घेऊन येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे दीपाली आणि कविता तिला भेटण्यासाठी गेल्या असता, तिथे चार महिला अगोदरच होत्या. त्यावेळी ममताने परपुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्याचे चांगले पैसे मिळतील, असे दीपाली आणि कविताला सांगितले. या प्रकारामुळे हादरलेल्या दोन्ही मैत्रिणींनी स्पष्ट नकार दिला. मात्र, ममता आणि तिच्या तीन मैत्रिणींनी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला; दोघींना धमक्याही दिल्या.त्यांच्या दबावाला दोन्ही मैत्रिणी बळी पडल्या. त्यानंतर, ममता सतत दीपालीला फोन करायची. त्याला कंटाळून दीपालीने ममताचा मोबाइल नंबर ब्लॉक केला. त्यानंतर, ममताने दुसºया नंबरवरून फोन करून सर्व प्रकार घरच्या लोकांना सांगण्याची धमकी दीपालीला दिली. त्यामुळे घाबरलेल्या दीपाली आणि कविता या दुष्टचक्रात अडकल्या.अखेर दुष्टचक्रातून सुटकाअनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी कारवाई करून या चार महिलांना बेड्या ठोकल्या. यामुळे दीपाली आणि कविताने सुटकेचा नि:श्वास टाकला.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणRapeबलात्कार