शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कामगार मृत्यूप्रकरणी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल करा, आयोगाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:26 IST

आयोगाचे निर्देश : वारसांना मिळाले काम

ठाणे : ढोकाळी भागात सेफ्टिक टँकची स्वच्छता करताना गुदमरून सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी ठाणे महापालिकेसह पोलिसांची मंगळवारी चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर मृतांच्या नातेवाइकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी ठाणे महापालिकेने कंत्राटी पद्धतीवर रोजगार प्राप्त करून दिला. त्याचे नियुक्तीपत्र मृतांच्या नातेवाइकांना हाथीबेड यांच्या हस्ते व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत दिले.

ठाणे जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांवर होणाºया अन्याय व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ते ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी १० मे रोजी ठाण्यातील ढोकाळीनाका येथील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झेरिया इमारतीच्या सेफ्टिक टँक अर्थात मलनि:स्सारण केंद्राचे (एसटीपी प्लांट) सफाई काम खासगी ठेकेदाराला दिले होते. या कामासाठी दुपारी आठ सफाई कामगार एसटीपी प्लांटमध्ये उतरले होते. यावेळी विषारी वायूची बाधा होऊन दुर्दैवाने अमित पुहाल (२०), अमन बादल (२१), अजय बुमबक (२४) या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. आयोगाने याची गाभीर्याने दखल घेऊन मंगळवारी जिल्हा नियोजन भवनात पार पडलेल्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने या विषयाला वाचा फोडून या प्रकरणातील दोषींवर पोलिसांनी काय कारवाई केली, कोणते गुन्हे दाखल केले, याचा आढावा घेतला. तसेच या प्रकरणार आरोपींवर गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल हाथीबेड यांनी केला. तेव्हा अ‍ॅट्रासिटी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात विधि विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, पालिकेने या मृतांच्या नातेवाइकांच्या हाताला काम मिळावे यासाठी कंत्राटी पद्धतीवर रोजगार प्राप्त करून दिला आहे. त्याचे नियुक्ती पत्र मृतांच्या नातेवाईकांना हाथीबेड यांच्या हस्ते व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत दिले.प्रत्येक पोलीस ठाण्यात सफाई कामगार नेमावाजिल्ह्यातील शहर पोलीस आयुक्तालयातील ३६ पोलीस ठाण्यांमध्ये अवघे २७ सफाईकामगार आहेत. त्यापैक ी जास्त सफाईकामगार शहर पोलीस मुख्यालयात असल्याने पोलीस ठाण्यात सफाईकामगारांची कमतरता आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात एक सफाईकामगार नेमावा, अशी सूचना करून पोलीस प्रशासनाने त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करावा, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी मंगळवारी ठाण्यात झालेल्या आढावा बैठकीत दिले. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका