शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

महापालिका आयुक्तांचे चौकशीचे आदेश; शिलाई मशीन खरेदी घोटाळा प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 01:37 IST

महिलांना स्वयंरोजगारासाठी म्हणून शिलाई मशीन खरेदीचा ठराव झाल्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन ३० ऑगस्टला मशीन खरेदीचे कार्यादेश श्री साई श्रद्धा महिला संस्थेला दिले.

मीरा रोड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पूर्वीच्या धोरणाला परस्पर तीलांजली देतानाच बाजार भावापेक्षा जास्त दराने महिला बालकल्याण समितीने शिलाई मशीन खरेदी केल्याचा प्रकार वादग्रस्त ठरला आहे. ठेकेदाराचा शिलाई मशीन वितरणाचा व्यवसाय नसताना ठेका दिला गेल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले असून नोटिस बजावून संबंधितांना खुलासा मागवला आहे.

महिलांना स्वयंरोजगारासाठी म्हणून शिलाई मशीन खरेदीचा ठराव झाल्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन ३० ऑगस्टला मशीन खरेदीचे कार्यादेश श्री साई श्रद्धा महिला संस्थेला दिले. उषा कंपनीच्या मार्वेला मॉडेलच्या १७० मशीन खरेदीसाठी प्रति मशिन ११ हजार ६०० रुपये ठेकेदारास अदा केले आहेत. त्यासाठी एकूण साडेएकोणीस लाख रुपये खर्च करण्यात आला होता. वास्तविक पूर्वीपासून समितीच्या ठरलेल्या धोरणानुसार प्रत्येक नगरसेवकास त्याच्या प्रभागात एक मशीन गरजू महिलेस वाटप करण्यास दिली जाते.

पालिकेत ९५ नगरसेवक असताना मशीन खरेदी मात्र तब्बल १७० केल्या गेल्या. बहुतांश नगरसेवकांना प्रत्येकी एक शिलाई मशीन देण्यात आली असताना महापौर डिम्पल मेहतांनी मात्र ३० पेक्षा जास्त मशीनचे पत्र देऊ न वाटप केल्या. विधानसभा निवडणूक असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी भाजपने जास्त मशीन खरेदी केल्याचा आरोप होत होता. या मशीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका कुसुम गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत केला होता. ज्या ठेकेदारास कंत्राट दिले त्यांचा सकस आहार, गणवेश, स्टेशनरी, ज्वेलरी मेकिंगचा व्यवसाय असल्याचे नमूद आहे.

डॉ. सुनील लहाने चौकशी अधिकारी

आयुक्त खतगावकर यांनी निवड समितीतल्या सदस्यांसह संबंधित विभागास नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. महिला बालकल्याण विभागाचे लिपीक यांचाही उल्लेख नोटिसीत आहे. त्यामुळे विभागासह निवड समिती याप्रकरणी काय खुलासा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौकशी अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना नियुक्त केले आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकthaneठाणेWomenमहिला