शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जुने ठाणे नवीन ठाणे प्रकरणाच्या चौकशी समितीचा अद्याप थांगपत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 17:34 IST

थीम पार्क संदर्भात महासभेत ठराव झाला असतांना सुध्दा त्याच्यावर अद्यापही स्वाक्षºया झाल्या नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनसुध्दा समिती गठीत झालेली नाही.

ठळक मुद्देआठवडा उलटूनही समिती गठीत नाहीचौकशी बारगळणार

ठाणे - थीम पार्क आणि बॉलीवुड पार्कच्या मुद्यावरुन गुरुवारी मागच्या महिन्यात दिवसभर चर्चा होऊन या संदर्भात चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचा ठराव करण्यात आला होता. परंतु एक आठवडा उलटून गेल्यानंतरही ना ठरावावर स्वाक्षऱ्या झाल्या ना समिती अद्याप गठीत झाली. त्यामुळे आता चौकशी होणार का? की इतर प्रकरणांप्रमाणेच हे प्रकरणही इतिहास जमा होणार अशी चर्चा मात्र सुरु झाली आहे.                          घोडबंदर भागातील नवीन ठाणे जुने ठाणे (थीम पार्क) च्या मुद्यावरुन मागील महिन्यात झालेल्या महासभेत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर आगपाखड केली होती. दिवसभर चर्चा झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानंतर जे सत्य बाहेर येईल त्यानुसार संबधीतावर कारवाई केली जाईल असाही निर्णय घेण्यात आला होता. तसेच या संदर्भातील ठरावही करण्यात आला होता. परंतु हा ठराव करतांना त्यावर तत्काळ स्वाक्षºया करुन समिती गठीत करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी भाजपाचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी केली होती. दुसरीकडे थर्ट पार्टी आॅडीटही करण्याचे निश्चित झाले होते. तर प्रशासनाने जे जे स्कुल आॅफ आर्ट मार्फत येथे बसविण्यात आलेल्या साहित्याच्या वस्तुस्थिती तपासली जाणार होती. परंतु त्याचेही पुढे काय झाले याचे उत्तरही अद्याप मिळू शकलेले नाही.दरम्यान मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात यावर चर्चा झाल्यानंतर एक आठवडा उलटूनही ना ठरावाचा थांगपत्ता लागलेला आहे, की त्यावर स्वाक्षºया सुध्दा झालेल्या नाहीत. आमच्याकडे ठराव आल्यानंतरच आम्ही समिती गठीत करु शकतो. परंतु अद्यापही तो प्राप्त झाला नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे या संदर्भात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे चर्चा केली असता, समिती अद्याप गठीत झालेली नाही. प्रशासनाला त्या अनुषंगाने सांगण्यात आले आहे. परंतु ठरावाचे काय झाले याचे उत्तर मात्र त्यांचेकडे नव्हते. एकूणच इतर प्रकरणांप्रमाणेच या प्रकरणावरसुध्दा अचानक पडदा पडतो की काय अशी चर्चा मात्र जोर धरु लागली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त