शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर पोलिसांकडे चरस तस्करांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 06:05 IST

थेट जम्मू-काश्मीरमधून मुंबई-ठाण्यात चरसची तस्करी करणाºया साजीद खानसह तिघांना मुंब्य्रातून अटक केल्यानंतर त्यांच्यावर आणखी कोणते गुन्हे दाखल आहेत का? त्यांचे दहशतवाद्यांशी काही संबंध आहेत का? यादृष्टीनेही आता ठाणे पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलिसांकडून माहिती मागवली आहे.

ठाणे - थेट जम्मू-काश्मीरमधून मुंबई-ठाण्यात चरसची तस्करी करणाºया साजीद खानसह तिघांना मुंब्य्रातून अटक केल्यानंतर त्यांच्यावर आणखी कोणते गुन्हे दाखल आहेत का? त्यांचे दहशतवाद्यांशी काही संबंध आहेत का? यादृष्टीनेही आता ठाणे पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलिसांकडून माहिती मागवली आहे.साजीद, अब्दुल गुजली व मोहम्मद मकबूल भट या तिघांना मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे आणि विकास घोडके यांच्या पथकाने १ मार्चला अटक केली. त्यांच्याकडून ३१ लाख ४० हजारांचे १५ किलो ७०० ग्रॅम चरस, तसेच एक लाख ७३० रुपयांची रोकड असा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात चरससारखा अमली पदार्थ मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी करण्यात येत आहे. शिवाय, जम्मू-काश्मीर पोलिसांचीही त्याबाबत मदत घेण्यात येत आहे.ठाणे पोलीस आयुक्तांमार्फत याबाबतचे पत्र जम्मू-काश्मीर पोलिसांना पाठवण्यात आले आहे. या पत्रातून ठाणे पोलिसांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात १ मार्चला दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपशील दिला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर पोलिसांकडून त्याबाबत तपशीलवार माहिती मिळाल्यास अटक केलेल्या या तिघांकडून आणखी उकल होण्यास मदत मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुलनेने जम्मू-काश्मीरमधून आणलेला हा चरस उच्च प्रतीचा मानला जातो. त्यामुळे त्याची आंतरराष्टÑीय बाजारपेठेत किंमतही किलोमागे दोन कोटींच्या घरात आहे. त्यामुळेच मुंब्य्रात त्यांचे नेमके कोण कोण गिºहाईक आहेत? याचाही तपास सुरू असल्याची माहिती प्रदीप शर्मा यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा