शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यांची चौकशी करा; बसच्या दुरवस्थेबाबत सदस्य संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:49 IST

केडीएमटीच्या ६९ बसची समितीकडून पाहणी

कल्याण : जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुर्त्थान अभियानांतर्गत केडीएमसीच्या परिवहन विभागाने खरेदी केलेल्या ६९ बस देखभाल दुरुस्तीअभावी लिलावात काढण्याची वेळ का आली, बसच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, सात वर्षांतच बस भंगारात निघण्याचे कारण काय?, असा सवाल पाहणी समितीने मंगळवारी केला. दरम्यान, आता समितीच्या निर्णयानंतर बस भंगारात अथवा लिलावात काढण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.केडीएमटीच्या ६९ बस भंगार अथवा लिलावात काढण्याचा प्रस्ताव आगस्टच्या महासभेच चर्चेला आला होता. त्यावेळी त्याला शिवसेना सदस्य सचिन बासरे यांनी जोरदार विरोध केला होता. इतक्या कमी कालावधीत देखभाल दुरुस्तीअभावी बस भंगार अथवा लिलावात काढणे योग्य आहे का? या बसची पाहणी केल्याशिवाय निर्णय घेऊ नये, असा मुद्दा उपस्थित केल्याने हा विषय स्थगित ठेवला होता. त्यामुळे महापौर विनीता राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंगळवारी मेट्रो मॉलच्या आवारातील ६९ बसची पाहणी केली. यावेळी राणे, स्थायीचे सभापती दीपेश म्हात्रे, भाजप गटनेते विकास म्हात्रे, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती रेखा चौधरी, शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर, परिवहन समितीचे सभापती मनोज चौधरी, नगरसेवक सचिन बासरे, सुधीर बासरे, अभिमन्यू गायकवाड आणि परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके आदी उपस्थित होते.बसच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या अधिकाºयांची चौकशी करावी, अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी केली. मेट्रो मॉलमधील बसवर वेली, तर इंजिनमध्ये झुडुपे उगविली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.केडीएमसीने नेहरु नागरी पुनरुर्त्थान अभियानांतर्गत मिळालेल्या निधीतून ६९ बस २०११ मध्ये खरेदी केल्या होत्या. या बस २०१७ पासून मेट्रो मॉलच्या परिसरात उभ्या आहेत. केवळ सहा ते सात वर्षेच त्या रस्त्यावर धावल्या. देखभाल दुरुस्ती व पुरेसे कर्मचारी नसल्याने या बस धूळ खात पडलेल्या आहेत. सातच वर्षांत या बस भंगारात कशा निघल्या, असा सवाल यावेळी सदस्यांनी केला.महापालिकेतील १२२ नगरसेवकांनी त्यांच्या निधीतील एक लाख रुपये बसच्या दुरुस्तीसाठी दिल्यास एक कोटी २२ लाखांचा निधी जमू शकतो. निधी देण्याची सदस्यांची तयारी असली तरी ६९ बस चालविण्यासाठी २३८ कर्मचारी लागणार आहेत. तो कुठून आणणार, असा सवाल प्रशासनाचा आहे. त्यामुळे या बस जेसीसी तत्वावर दिल्यास कंत्राटदार उर्वरित सगळा खर्च करणार आहे. त्यातून एका बसमागे केवळ दोन हजार रुपयांचे उत्पन्न महापालिकेस मिळणार आहे. महापालिकेचा हा तोटा विचारात घेऊन सदस्यांनी जेसीसीला विरोध केला आहे.मेट्रो मॉल परिसरातील बसच्या पाहणीनंतर समितीने त्यांचा मोर्चा गणेशघाट येथील परिवहन कार्यशाळेकडे वळविला. तेथे ४९ बस भंगारात सडत आहेत. या बस इंजिन घोटाळ्यातील असल्याने त्या भंगारात काढण्याविषयीचा निर्णय घेतला जात नसल्याचे प्रशासनाकडून समितीला सांगण्यात आले. यंदा झालेल्या अतिवृष्टीचा फटका या कार्यशाळेस बसला. कार्यशाळा पडण्याच्या बेतात असल्याने तेथे जीवित व वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे कार्यशाळा दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासनाकडून का आणला जात नाही, असा सवाल सदस्यांनी यावेळी केला.एसी बस ठरताहेत पांढरा हत्तीसमितीने वसंत व्हॅली येथील बाळासाहेब ठाकरे परिवहन डेपोचीही पाहणी केली. तेथे दोन एसी बस होत्या. तर, अन्य बसची चाके काढून ठेवलेली होती. परिवहनकडे केवळ ८० बस चालविण्याचे कर्मचारी आहेत.परिवहनने घेतलेल्या एसी व्होल्वो बसचे इंजिन ‘बीएस-३’ प्रकारातील होते. परंतु, या बसच्या एका किलोमीटरमागे ४८ रुपये तोटा होत आहे.त्यामुळे बसखरेदी करताना याबाबी विचारात घेतल्या नाहीत का? या बसच्या देखभाल दुरुस्तीचे नियोजन नसल्याने बस असूनही प्रवाशांच्या सेवेत नसल्याचा मुद्दाही सदस्यांनी यावेळी मांडला.