शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

खाजगी कंपन्यांचा पुढाकार; गावपाड्यांची तीव्र पाणीटंचाई संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:57 IST

मुंबईसह जिल्ह्यातील शहरांना मुबलक पाणीपुरवठा ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून होतो. मात्र, तेथील गावपाडे दरवर्षी तीव्र पाणीटंचाई सहन करत आहेत. त्यावर मात करण्यासाठी खाजगी कंपन्यांनी कंबर कसली आहे.

ठाणे : मुंबईसह जिल्ह्यातील शहरांना मुबलक पाणीपुरवठा ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून होतो. मात्र, तेथील गावपाडे दरवर्षी तीव्र पाणीटंचाई सहन करत आहेत. त्यावर मात करण्यासाठी खाजगी कंपन्यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांतील गाळ काढून त्यांची पाणीसाठवण क्षमता वाढवणार आहे. तर, काढलेला गाळ माळरानावर पसरवून गाळयुक्त शिवाराची ११६ कामे खाजगी कंपन्यांद्वारे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत.जागतिक जल दिनाचा कार्यक्रम नियोजन भवन सभागृहात गुरुवारी पार पडला. त्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणी ११६ कामे सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून हाती घेण्यासाठी छोट्यामोठ्या कंपन्या पुढे आल्याची माहिती उघड झाली. या कार्यक्रमास माजी आ. दिगंबर विशे, उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, अधीक्षक अभियंता बा.भा. लोहार, सहा. आयुक्त उदयकुमार शिरूरकर, वसुंधरा संजीवनी मंडळाचे आनंद भागवत आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील लहान, मोठ्या कंपन्यांना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पत्र देऊन आदिवासी गावांमध्ये पाणीसाठवण क्षमता वाढेल, असे तलाव, बंधाऱ्यांतील गाळ काढणे, नाला खोलीकरण, रुंदीकरण, छोटे बंधारे, रिचार्ज शाफ्ट, विहिरी नूतनीकरण, दुरुस्तीकरण अशी विविध कामे सीएसआरमधून करण्याचे आवाहन कंपन्यांना केले. त्यास अनुसरून यंदा ११६ कामे जिल्ह्यात विविध ठिकाणी कंपन्यांकडून केली जात आहेत.जिल्ह्यातील ११६ कामांपैकी लघुपाटबंधारे विभागाकडून ५० कामे, विहीर दुरु स्तीसारखी ३६ कामे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे होणार आहेत. जलसंधारणच्या नियंत्रणातून केटी बंधाºयांसारख्या १० कामांसह छोटे बंधारे बांधले जाणार आहेत. भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून १० कामे प्राधान्याने यंदा होतील. या कामांमुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करून शेतीला देखील मुबलक पाणी देणे शक्य असल्याचे उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी यांनी सांगितले.जलयुक्त शिवार कामांसाठी यंदा ४४ गावांची निवडयंदा शहापूर, मुरबाड, भिवंडी या ग्रामीण तालुक्यांसह कल्याण, अंबरनाथ या शहरी तालुक्यांच्या ग्रामीण क्षेत्रातील जलयुक्त शिवारच्या कामांसाठी ४४ गावांची निवड झाली आहे. यातील काही गावे आदिवासी क्षेत्रातील आहेत, तर २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवारसाठी २६ आणि २०१६ -१७ साठी १८ गावे निवडली होती. मागील वर्षीदेखील पाण्यासाठी जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेत विविध कंपन्या आणि संस्थांचे पाठबळ घेतले होते.यादरम्यान जिल्हा प्रशासनाने ८० कामे करून १.१७ लाख घनमीटर गाळ काढला होता. याप्रमाणेच यंदाही या योजनेतूनच जिल्ह्यात ११६ कामे कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून घेण्यात आली आहेत. मुरबाड तालुक्यातील कनकवीरा नदी जिवंत झाल्याचे आनंद भागवत यांनी यावेळी सांगितले. पाण्याची निर्मिती करता येत नाही, पण पाण्याची बचत आपण करू शकतो.याशिवाय, रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर दिला पाहिजे, असे उदयकुमार शिरूरकर यांनी नमूद केले. ठाणे पाटबंधारे विभागाने जलजागृती सप्ताहात विविध कार्यक्र म, स्पर्धा, पथनाट्ये, जलरथ या माध्यमांतून जनजागृती केली आणि नागरिकांच्या समस्या समजावून घेतल्याचे लोहार यांनी स्पष्ट केले. पाण्याचे रिसायकलिंग केल्यास पाण्याचा नाश थांबवणेदेखील शक्य असल्याचे त्यांनी यावेळी पटवून दिले.

टॅग्स :thaneठाणे