शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

टेंबा रुग्णालयाची माहिती आरोग्य विभागाला सादर

By admin | Updated: August 28, 2015 00:18 IST

राज्याचे आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव शेखर ढवळे व आरोग्य संचालनालयाने पालिकेकडे टेंबा रुग्णालयाची माहिती मागविली असून ती

- राजू काळे,  भार्इंदरराज्याचे आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव शेखर ढवळे व आरोग्य संचालनालयाने पालिकेकडे टेंबा रुग्णालयाची माहिती मागविली असून ती पाठविण्यात आल्याचे पालिकेचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी लोकमतला सांगितले.मीरा-भार्इंदरसह राज्यातील ३३ रुग्णालयांच्या धोरणात्मक निर्णयाची घोषणा हवेत विरल्याचे वृत्त १० आॅगस्टच्या लोकमत अंकात प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊनपालिकेचे रखडलेले टेंबा रुग्णालय सुरू करण्याची आर्थिक कुवत नसल्याची बाजू मांडल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाने हे रुग्णालय पालिकेनेच चालविण्याचा निर्णय सप्टेंबर २०१४ मध्ये दिला. परंतु, हे रुग्णालय चालविणे पांढरा हत्ती पोसण्यासारखे असल्याने रुग्णालयाच्या खर्चासाठी जुलै २०१५ मधील महासभेने अशासकीय निधी स्वीकारण्याच्या धोरणाला मान्यता दिली आहे. तत्पूर्वी रुग्णालय राज्य शासनामार्फतच चालविण्याचा ठराव आॅगस्ट २०१२ मधील महासभेत मंजूर करून तो दिवाणी अर्जाच्या माध्यमातून परवानगीसाठी तो उच्च न्यायालयात दाखल केला असता तो फेटाळण्यात आला होता. त्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून टेंबा रुग्णालयासह राज्यातील ३३ रुग्णालये चालविण्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आ. प्रताप सरनाईक यांनी डिसेंबर २०१४ मध्ये पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे मागणी केली होती. आरोग्यमंत्र्यांनी ११ डिसेंबर रोजी नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत टेंबा रुग्णालयासह राज्यातील ३३ रुग्णालयांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने ती घोषणा हवेतच राहिल्याचे वृत्त १० आॅगस्टच्या लोकमत अंकात प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत राज्याचे आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणेचे उपसंचालक रत्ना रावखंडे यांनी पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पडवळ यांना संपर्क साधून टेंबाची माहिती मागितली होती.