शहरं
Join us  
Trending Stories
1
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
2
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
3
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
8
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
11
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
13
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
14
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
15
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

खाद्यतेलास बसलीय महागाईची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : डाएट फॉलो करणारी मंडळी जेवणात तेलाचा वापर कमी करीत असली, तरी आपली खाद्यसंस्कृती चमचमीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : डाएट फॉलो करणारी मंडळी जेवणात तेलाचा वापर कमी करीत असली, तरी आपली खाद्यसंस्कृती चमचमीत तेलाचा तडका असलेले पदार्थ खाण्याकडे जास्त कल असलेली आहे. शाकाहारी जेवणात तळलेला पापड खाणे, भाज्यांमध्ये तेल आणि चपाती बनवताना तेल लागते. प्रत्येक राज्यानुसार जेवण तयार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्य़ा असल्या, तरी जेवण तयार करताना तेलाचा वापर हा केला जातो. मराठी माणसे जेवणात शेंगदाणा, सनफ्लॉवर आदी तेलाचा वापर करतात. बंगाली आणि उत्तर भारतीय लोक राईच्या तेलाचा वापर करतात. तसेच सोयाबीन तेलही वापरले जाते. चमचमीत रस्सा तयार करण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. भजी, वडा तसेच हलवायाच्या दुकानातील शेव, बुंदी, फाफडा, चिवडा आदीसाठी तेलाचा वापर केला जातो. व्यावसायिक रिफाइंड तर काही पाम तेलाचा वापर करतात. कोरोनाकाळानंतर बाजाराची स्थिती पाहता तेलाच्या भाव वाढले आहेत. तेलाच्या भावाने मार्चमध्ये उच्चांक गाठला आहे. त्यात सनफ्लॉवर तेलाचे दर दुपटीने वाढले तर शेंगदाणा तेलाचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले. आहाराच्या पद्धती आणि आहारविषयक जागरूकता वाढत असल्याने काही मंडळी पुन्हा घाण्याच्या तेलाकडे वळत आहे. कल्याणमध्ये दोन ठिकाणी घाण्याचे तेल तर डोंबिवलीत एका ठिकाणी घाण्यावर काढलेले विविध प्रकारचे खाद्यतेल विकले जात आहे. घाण्याचे तेल ब्रॅण्डेड कंपन्यांच्या तेलाच्या तुलनेत २० टक्के जास्त असते. त्यालाही बाजारात मागणी आहे. तेलाचा पुरवठा कमी आहे. त्यामुळेही तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत.

--------------

मार्चमध्ये उच्चांक

मार्च महिन्यात सनफ्लॉवर तेलाने उच्चांक गाठला आहे. त्याच्या दरात ६० टक्के वाढ झाली आहे. स्थिती अशीच राहिल्यास सनफ्लॉवर तेलाचा दर जून महिन्यापर्यंत प्रतिलीटरला २०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

--------------

कशामुळे वाढ

अवकाळी पावसामुळे तेलबियांचे उत्पादन कमी झाले. त्यामुळेही ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी मागणी वाढली असून पुरवठा कमी झाल्याने दरवाढ जाणवत आहे.

--------------

आपल्याकडे तेल आयात केले जाते. त्यामुळे तेलाची टंचाई वाढली आहे. भारतीय तेलाची बाजारपेठ पामबेस ऑइल आहे. त्यावर कर वाढल्याने दर वाढले आहे. त्यात सनफ्लॉवर तेलाचे दर जास्त वाढले आहेत. शेंगदाणा तेलाचे दर त्या तुलनेने कमी वाढले आहेत.

कुशल गोसावी, व्यापारी

--------------

गृहिणी

१. आमच्या जेवणात शेंगदाणा तेल आहे. महागाई वाढली आहे. त्यात कोरोनामुळे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत शेंगदाणा तेलाचे भाव २० टक्के वाढले आहेत.

-प्रियंका मेस्त्री

२. जेवणात आम्ही सनफ्लॉवरचे तेल वापरतो. सनफ्लॉवर तेलाच्या दरवाढीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे त्याची झळ आम्हाला बसली आहे.

-शोभा शेट्टी

३. आम्ही उत्तर भारतीय असल्याने आमच्या जेवणात राईच्या तेलाचा जास्त वापर आहे. राई तेल मागच्या वर्षी ८५ रुपये लीटर होते. ते आता १३५ रुपये लीटर दराने मिळत आहे. भाववाढ झाली आहे. त्याचा फटका आमच्या खिशाला बसला आहे.

-राधिका गुप्ता

--------------

तेलाचे दर प्रति लीटर

एप्रिल २०२१

शेंगदाणा-१६० रुपये

सनफ्लॉवर-१६५

सोयाबीन-१३२

राई-१३५

तीळ-१९०

राइसबन-१६०

------------

मागच्या मार्च महिन्यातील दर

शेंगदाणा-१४५ रुपये

सनफ्लॉवर-९५

सोयाबीन-८५

राई-११०

तीळ-१२०

राइसबन-११०

------------

वाचली