ठाणे, दि. १५ - कार्ल्यात एकविरा देवीच्या पालखीवरुन झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कोळी बांधवांनी माजी आमदार अनंत तरे यांचा गुरुवारी रात्री पुतळा जाळला.
कार्ल्याच्या एकविरा देवीच्या पालखी मिरवणुकीत परवा दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी पालखीच्या मानातून पेणकर आणि ठाणेकरांमध्ये हा वाद झाला. आता या वादाचे पडसाद काल रात्री ठाण्यात उमटले. ठाणे पश्चिम येथील सिडको स्टॉपजवळ काही कोळी बांधवांनी माजी आमदार अनंत तरे यांच्या पुतळ्याचे दहन केले.
(फोटो - विशाल हऴदे)