शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

रुग्णांना चक्क इंडस्ट्रियल ऑक्सिजन; मुरबाडच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जीवघेणे उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:16 AM

मुरबाड भागात अनेक खाजगी हॉस्पिटल्स असून तिथे रु ग्णांवर वेगवेगळ्या शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध असल्याच्या जाहिराती ठिकठिकाणी केल्या आहेत.

मुरबाड : केवळ पैसे वाचवण्यासाठी रुग्णांना मेडिकल ऑक्सिजन देण्याऐवजी इंडस्ट्रियल आॅक्सिजन दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुरबाडच्या श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार असून, संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या गंभीर प्रकाराचे खापर सहकारी कर्मचाऱ्यांवर फोडले आहे.

मुरबाड भागात अनेक खाजगी हॉस्पिटल्स असून तिथे रु ग्णांवर वेगवेगळ्या शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध असल्याच्या जाहिराती ठिकठिकाणी केल्या आहेत. मात्र उपचाराच्या नावाखाली या हॉस्पिटल्समध्ये गंभीर गैरप्रकार सुरु असल्याचे उघड झाले आहे. रुग्णांना बरेचदा कृत्रिम प्राणवायू (आॅक्सिजन) देण्याची गरज भासते. त्यासाठी मेडिकल आॅक्सिजन सिलिंडरचा वापर केला जातो. याशिवाय बाजारपेठेत इंडस्ट्रियल आॅक्सिजन सिलिंडरही उपलब्ध असतात. या सिलिंडरचा वापर मुख्यत्त्वे वेल्डिंगसाठी केला जातो. मेडिकल आॅक्सिजन सिलिंडरच्या तुलनेत इंडस्ट्रियल आॅक्सिजन सिलिंडर स्वस्त असतात. त्यामुळे स्वत:चा नफा वाढवण्यासाठी काही हॉस्पिटल रुग्णांना चक्क इंडस्ट्रियल आॅक्सिजन देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तज्ज्ञांच्या मते, इंडस्ट्रियल आॅक्सिजन सिलिंडर दिल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांचे आयुर्मान घटण्याची दाट शक्यता असते. मुरबाड शहरातील म्हसा रोडवर असलेल्या श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असाच प्रकार उघडकीस आल्याने डॉक्टरांवर कारवाईची मागणी जोर होत आहे.हॉस्पिटलमधील मेडिकल ऑक्सिजन संपल्यावर माझ्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांनी इंडस्ट्रीयल ऑक्सिजन सिलेंडर आणले होते. - डॉ. विश्वनाथ पवार, श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मुरबाडमेडिकल ऑक्सिजनऐवजी इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा रूग्णांसाठी वापर करणे हे अत्यंत धोकादायक आहे. - डॉ. श्रीधर बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी, मुरबाड