अंबरनाथ : अंबरनाथ शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी शहरात चालतचालत प्लास्टिक कचऱ्याचे संकलन ( इंडिया प्लॉग रन) चे २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजन करण्यात आले आहे.केंद्र शासनाने ‘स्वच्छता ही सेवा’ योजनेंतर्गत देशातील ५२ शहरांची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील सात शहरांमधून अंबरनाथ शहराची निवड केली आहे, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी देविदास पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालिकेचे स्वच्छतादूत सलील जव्हेरी, आरोग्य अधिकारी सुरेश पाटील, प्रकल्पप्रमुख काशीद आणि संचित आदी यावेळी उपस्थित होते.घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्तीसाठी पालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून विविध स्तरांवर निर्णय घेण्यात आले. शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांची बैठक बोलावून विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांपर्यंत प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती केली. याशिवाय, प्रभागातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती. या उपक्र माला सर्व लोकप्रतिनिधी, बचत गट, धार्मिक संस्था यांचे योग्य सहकार्य लाभल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कागदी आणि कापडी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.गांधी जयंतीला २ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून इंडिया प्लॉग रनला आर्ट आॅफ लिव्हिंग, योगाचे सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये सुरु वात होणार आहे. सकाळपासूनच शहरातील प्रत्येक प्रभागांत शालेय विद्यार्थी, पालक घरोघरी जाऊन प्लास्टिक गोळा करणार आहेत. याशिवाय, रस्त्यावरील प्लास्टिक गोळा करून शहराच्या ठरवून दिलेल्या ठिकाणी जमा केले जाईल. त्यानंतर जमा झालेले प्लास्टिक पालिकेकडे जमा केले जाणार आहे. जमा झालेल्या प्लास्टिकवर पुनर्वापर प्रक्रि या केली जाणार आहे. यासाठी एका कंपनीशी करार झाला आहे. त्यामुळे अंबरनाथ प्लास्टिकमुक्त शहर होण्यास हातभार लागणार आहे. यासाठी शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातून सायकल रॅली काढण्यात येणार आहे. प्लास्टिकचा वापर करणाºया २८३ जणांवर नगरपालिकेने कारवाई करून साडेआठ कोटी दंडवसुली केल्याचे मुख्याधिकारी पवार यांनी सांगितले.
अंबरनाथमध्ये बुधवारी ‘इंडिया प्लॉग रन’चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 00:53 IST