शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

शिवसेना-भाजपाकडून स्वतंत्रपणे सत्तेची गणिते

By admin | Updated: February 24, 2017 07:15 IST

उल्हासनगरमध्ये शिवसेना, भाजपा स्वतंत्रपणे लढल्याने आणि निकालानंतर कोणाच्याच हाती पूर्ण बहुमत नसल्याने एकतर

पंकज पाटील /उल्हासनगर उल्हासनगरमध्ये शिवसेना, भाजपा स्वतंत्रपणे लढल्याने आणि निकालानंतर कोणाच्याच हाती पूर्ण बहुमत नसल्याने एकतर दोन्ही पक्षांनी एकत्र येणे किंवा छोटे पक्ष, अपक्षांना सोबत घेण्यावाचून दोघांनाही पर्याय उरलेला नाही. शिवेसना-भाजपाने एकत्र येणे मुंबईच्या निकालावर अलवंबून असल्याने तोवर दोन्ही पक्षांनी काही नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.उल्हासनगरमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला, तरी सत्तेसाठी त्यांनाही कसरत करावी लागणार आहे. सत्तेच्या गणितात माहीर असलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यातून उसंत मिळताच शिवसेनेतर्फे लागलीच उल्हासनगरवर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपापेक्षा जागा कमी असल्या, तरी भाजपाला सोडून इतर पक्षांना एकत्रित करुन सत्तेचे गणित जुळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुंबई आणि ठाण्यातील गणितांवर आणि निर्णयावर अवलंबून न राहता उल्हासनगरमध्ये जेवढे नगरसेवक गळाला लावता येतील, त्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू झाल्याचे समजते. सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक आकडा भाजपाकडे नाही. तो गाठण्यासाठी भाजपाचेही प्रयत्न सुरू आहेत. भाजपाकडे कमळाच्या चिन्हावरील ३२ विजयी उमेदवार असून पीपल्स रिपब्लीकन पार्टी, भारिप आणि भाजपा पुरस्कृत एक नगरसेवक मोजल्यास त्यांची संख्या ३५ होते. त्यांना आणखी पाच नगरसेवकांची गरज भासणार आहे. साई पक्षाने कलानी गटाच्या विरोधात निवडणूक लढविल्याने तो पक्ष सहजासहजी भाजपाकडे वळणार नाही, असा अंदाज होता. पण ओमी स्वत: निवडून न आल्याने साई पक्षाचा कलानी विरोध कितपत टिकतो, ते पाहणे महत्वाचे आहे. त्यातही भाजपा हा राज्यात आणि केद्रातील सत्तेत असलेला पक्ष असल्याने तोवर राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेसचा एक अशा पाच नगरसेवकांना फोडण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणून त्या नगरसेवकांना भाजपासोबत जाता येणार नाही, हे गृहीत धरून या संदर्भातील प्राथमिक बोलणी सुरु करण्यात आली आहे. केवळ साईचे जीवन ईदनानी यांना सोबत घेऊन शिवसेनेची सत्ता स्थापन होणार नाही. त्यामुळे शिवसेनेनेही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांवर जाळे फेकण्याची तयारी केली आहे. शिवसेनेचे २५, साई पक्षाचे ११ आणि रिपाइंचे २ अशा ३८ नगरसेवकांचे बळ तयार करुन राष्ट्रवादी, काँग्रेसला कह्यात घेण्याचा प्रयत्न शिवसेनतर्फे केला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेची गणिते पालकमंत्री एकनाथ शिंदे ठरवत आहेत. ठाण्यात शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाल्याने त्यांनी आपले लक्ष उल्हासनगरवर केंद्रीत केले आहे. मुंबईत युती झाल्यास ठाणे व उल्हासनगरमध्येही युती होण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईबाबत निर्णय प्रलंबित असल्याने आणि भविष्यात युतीचा निर्णय न झाल्यास उल्हासनगरची सत्ता गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी शिवसेनेने आत्ताच तयारी करुन ठेवली आहे. भाजपाकडे आकडा जास्त असला, तरी त्यांच्याकडे साई आणि राष्ट्रवादी सहज वळणार नाही याची कल्पना भाजपाच्या नेत्यांनाही आहे. मात्र हेच दोन्ही पक्ष वेळेवर शिवसेनेसोबत जाऊन कलानी आणि भाजपा यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळेच मुंबईच्या निर्णयाची वाट न पाहता सेनेतर्फे शिंदे यांनी आपली यंत्रणा कामाला लावली असून येत्या दोन दिवसांत त्या बाबतच्या बैठकांचे सत्रही सुरू होईल. सत्तेच्या या गणितात साई पक्षाचे शिवसेनेला झुकते माप असेल, हे निवडणुकीपूर्वीपासूनच निश्चित मानले जात आहे. मात्र भाजपाचे काही पदाधिकारी साईला सत्तेचा समान वाटा देऊन आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे साई पक्षाच्या भूमिकेवर सत्तेची गणिते ठरतील. साईसोबत चर्चा यशस्वी न झाल्यास किंवा त्यांनी अवास्तव मागण्या केल्यास शिवसेना आणि भाजपा कमीपणा घेऊन युती करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कलानींना दूर ठेवण्याचे प्रयत्न भाजपाने ओमी कलानी टीमला घेऊन शिवसेनेविरोधात निवडणूक लढविल्याने कलानी पर्वाचा अस्त करण्यासाठी शिवसैनिक भाजपाच्या विरोधात ठाकले होते. कलानीविरोधामुळे विजयी उमेदवारांची भाजपासोबत जाण्याची इच्छा नसली, तरी पक्षाच्या आदेशावर शिवसेना चालत असल्याने कोणीही उघडपणे आपली मते मांडत नाही. मात्र शिवसेना-भाजपा यांनीच एकत्र यावे, असे आदेश येतील तेव्हा पाहू अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. प्रत्यक्षात ओमी कलानी निवडून आलेले नाहीत. त्यातही त्यांचा बहुतांश गट हा कमळ चिन्हावर निवडून आला आहे. त्यामुळे तो कलानी गट म्हणून ओळखला न जाता यापुढे भाजपा म्हणूनच ओळखला जाईल. त्यामुळे ओमी यांना बाजुला ठेवल्यास भाजपाला साई पक्षाशीही वाटाघाटी करता येतील किंवा शिवसेनेलाही सोबत घेता येतील, अशीही चर्चा रंगली आहे.