शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १ ऑगस्टपासून 2.5 लाख रिक्षा चालकांचा बेमुदत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:28 IST

अडीच लाख चालक होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वाढत्या सीएनजी दरामुळे रिक्षा भाडेवाढ लागू करावी तसेच रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांच्या इतर प्रलंबित मागण्या सोडविण्याकडे राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १ ऑगस्टपासून कोकण विभागातील सर्व रिक्षा-टॅक्सीचालकांनी बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी मंगळवारी दिली. अडीच लाख रिक्षाचालक या बंदमध्ये सहभागी होतील, असा दावा त्यांनी केला.

सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे.  परिवहन प्रशासन इंधन दरवाढ नियंत्रण किंवा महागाई निर्देशांकानुसार रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. गेल्या दोन वर्षांत सीएनजी दरामध्ये किलोमागे सरासरी  २८ रुपये इतकी वाढ झालेली आहे.  परिवहन विभागाने रिक्षा-टॅक्सी परवाने वाटप तत्काळ बंद करावे. नव्या मोटार वाहन कायद्यानुसार ई-चलनाद्वारे दंड आकारणी करावी. वाहतूक पोलीस विभागामार्फत मोबाइल फोटोद्वारे करण्यात येणारी वसुली बंद करावी. रिक्षा -टॅक्सी व्यावसायिकांकरिता महामंडळ स्थापन करून माथाडी कामगारांच्या धर्तीवर सोयीसुविधा पुरवाव्यात आदी मागण्या केल्या आहेत. कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या रिक्षा, टॅक्सीचालकांना शेतकऱ्यांप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी जितेंद्र इंदिसे, दयानंद गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते.

मनमानी असेल तर तक्रार कराकाेणी रिक्षाचालक जर मनमानी पद्धतीने जादा प्रवासी नेत असेल किंवा शेअर रिक्षाच्या प्रवाशांकडून जादा भाडे वसूल करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध आरटीओकडे तक्रार करावी. संघटना अशा रिक्षाचालकांचे समर्थन करणार नाही; परंतु भाडे नाकारण्याला काही याेग्य कारणे असतात, हेही प्रवाशांनी लक्षात घ्यावे, असे पेणकर व इंदिसे म्हणाले.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाEknath Shindeएकनाथ शिंदे